Mumbai News: पावसाळ्यात मुंबईतील रहिवाशांना बऱ्याच समस्यांना सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळतं. अचानक पावसाने जोर घेतल्यावर उद्भवणाऱ्या समस्यांमुळे मुंबईकरांचे हाल होतात. मात्र, पावसामुळे कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास मुंबईकरांच्या सुरक्षिततेला अनुसरुन मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने पूर्वतयारी आणि व्यवस्थापनेच्या दृष्टीने काही नवीन उपाययोजना आखल्या आहेत. याविषयी सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
पर्यायी नियंत्रण कक्ष
पावसाळ्यात आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांशी समन्वय टिकवण्यात बाधा येऊ नये, यासाठी परळमधील बेस्ट वसाहतीच्या शेजारी असलेल्या शहर आपत्ती प्रशिक्षण संस्थेत पर्यायी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष बिनतारी यंत्रणा, हॉटलाइन आणि हॅम रेडिओने जोडलेला असून तो 24 तास कार्यरत राहणार आहे.
वृक्ष पर्यवेक्षकांची नेमणूक
जोरादार पावसामुळे झाडे तसेच झाडांच्या फांद्यांमुळे अपघात घडत असल्याच्या देखील बातम्या समोर येत असतात. यादरम्यान, तातडीने सेवा पुरवण्यासाठी महापालिका विभाग कार्यालयात कनिष्ठ वृक्ष पर्यवेक्षकांची नेमणूक महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तीनही सत्रांमध्ये करण्यात आली आहे.
हे ही वाचा: मोठी बातमी: अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान शेवटच्या क्षणी रद्द, नेमकं काय घडलं?
आपत्कालीन स्थितीत एकत्र जमण्याची ठिकाणे
पावसाच्या काळात आपत्तीमुळे बेघर झालेल्या लोकांना तात्पुरता आश्रय मिळावा त्यासोबत वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण झाल्यास रेल्वे स्थानकांत अडकलेले प्रवासी, यासाठी महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमधील पाच शाळा आपत्कालीन स्थितीत एकत्र जमण्याच्या ठिकाणे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईतील शहरांमध्ये पूरासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास तिथल्या रहिवाशांचं स्थलांतर करण्यासाठी 20 जीवरक्षक तराफे आणि त्यांच्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान तसेच पोलीस पेट्रोलिंग वाहनं तैनात करण्यात आली आहेत.
हे ही वाचा: कोल्हापूर: नव्यानेच लग्न झालेल्या पती-पत्नीचा बाथरूममध्ये एकाच वेळी मृत्यू, असं घडलं तरी काय?
नागरिकांसाठी मोबाईल अॅपवर पावसाची माहिती
मुंबई महापालिकेच्या विभागांमार्फत पावसाच्या परिस्थितीबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी मोबाईल अॅप देखील उपलब्ध करण्यात आलं आहे. शहरातील नागरिकांसाठी 'Disaster Management BMC'अॅप्लिकेशन उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, 1916 या हेल्पलाइन क्रमांकावर येणाऱ्या तक्रारी नोंदवण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे.
ADVERTISEMENT
