Mumbai News: मुंबईतील पहिल्या अंडरग्राउंड मेट्रोनंतर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) आता वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतच्या दुसऱ्या मेट्रो मार्गिकेवर लक्ष केंद्रित करत आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी, MMRC ने अंतरिम सल्लागार (कंसल्टंट) नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे सल्लागार नियोजन, डिझाइन, बांधकाम देखरेख आणि गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
ADVERTISEMENT
कसल्टंटचं सर्वात महत्वाचं काम
याशिवाय, सल्लागार हे प्रोजेक्टसाठी निविदा (बिड) तयार करण्यात एमएमआरसीला मदत करतील. कसल्टंटचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे साइटवर सुरू असलेल्या बांधकाम कामाचे बारकाईनं निरीक्षण करणं. सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर, प्रकल्पाशी संबंधित इतर निविदा प्रक्रियेचं काम देखील पुढे सरकेल. एमएमआरसीने या नियुक्तीसाठी निविदा मागवल्या आहेत. यासाठी 4 नोव्हेंबर रोजी प्री-बिड बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच कंपन्या 3 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
हे ही वाचा: छत्रपती संभाजीनगर: मित्रासोबत बोलत असताना अचानक छातीत चाकू भोसकला अन्... CCTV मध्ये थरार घटना कैद
एमएमआरसीला निविदा तयार करण्यात मदत
याशिवाय, कंसल्टंट एमएमआरसीला निविदा तयार करण्यात देखील मदत करेल. निविदा अटी स्पष्ट आहेत आणि फक्त योग्य कंपन्याच बोली लावतील, अशी सल्लागार खात्री करतो. कंसल्टंटचं महत्त्वाचं काम म्हणजं साइटवरील चालू बांधकामाचं सतत निरीक्षण करणं आणि कोणत्याही त्रुटी उद्भवू नयेत यासाठी लहान-मोठ्या प्रत्येक तपशीलाची तपासणी करणे.
हे ही वाचा: पती झोपलेला असताना अंगावर उकळतं पाणी अन् अॅसिड फेकलं... ऐन दिवाळीत पत्नीचं पतीसोबत जीवघेणं कृत्य!
मुंबईच्या विकासात आणखी एक मैलाचा दगड
ही नवीन मेट्रो लाईन मुंबईतील लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत प्रवास करणे खूप सोपे होईल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि लोकांचा वेळ वाचेल. हा प्रोजेक्ट मुंबईच्या विकासात आणखी एक मैलाचा दगड ठरेल. एमएमआरसी या प्रकल्पाबद्दल खूप उत्साही आहे आणि तो शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सल्लागाराची नियुक्ती हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
ADVERTISEMENT
