मुंबई: रागाच्या भरात वडिलांचं निर्घृण कृत्य! 14 वर्षीय मुलीची जड वस्तूने हल्ला करत हत्या अन् पत्नी गंभीररित्या जखमी

या प्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आपल्याच वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

14 वर्षीय मुलीची जड वस्तूने हल्ला करत हत्या

14 वर्षीय मुलीची जड वस्तूने हल्ला करत हत्या

मुंबई तक

• 12:08 PM • 21 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रागाच्या भरात वडिलांचं निर्घृण कृत्य!

point

14 वर्षीय मुलीची जड वस्तूने हल्ला करत हत्या

point

पत्नी गंभीररित्या जखमी

Mumbai Crime: वडिलांनी रागाच्या भरात आपल्याच मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आपल्याच  वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, संबंधित आरोपीने त्याच्या पत्नीला सुद्धा गंभीररित्या जखमी केल्याची माहिती आहे. क्राइम ब्रांच युनिटने या प्रकरणातील आरोपीला बिहारमधून अटक केल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचलं का?

आरोपी तरुणाला अटक  

ही घटना 15 ऑक्टोबर रोजी सांताक्रूझ पूर्व येथे वाकोला परिसरात घडली. युनिट 8 चे निरीक्षक लक्ष्मीकांत साळुके यांच्या नेतृत्वाखाली तया झालेल्या पोलिस पथकाने आरोपी सुलेमान रज्जाक कुजरा नावाच्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा: दोन मुलांची आई दुसऱ्यांदा पतीला सोडून दीरासोबत गेली पळून! मात्र, जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळले अन् रुग्णालयात नेताच...

हल्ल्यानंतर आरोपी फरार 

प्रकरणातील आरोपी व्यक्ती सांताक्रूझ (पूर्व) येथील कालिना, ओल्ड सीटीसी रोड येथील शिवनगर चाळीतील रहिवासी असल्याची माहिती आहे. 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी फरार होता. त्याने त्याची पत्नी नसीमा (35) आणि 14 वर्षांच्या मुलीवर जड वस्तूने हल्ला केल्याची माहिती आहे.

हे ही वाचा: नवी मुंबईत अग्नी तांडव, सोसायटीला लागलेल्या भीषण आगीत माय-लेकींचा मृत्यू; सर्वत्र धुराचे लोट

विविध कलमांखाली आरोपींवर गुन्हा दाखल  

या हल्ल्यात पीडित मुलीचा जागीच मृत्यू झाला तसेच, पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 16 ऑक्टोबर रोजी वाकोला पोलिसांनी व्हीएनएसच्या संबंधित कलमांखाली खून आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई क्राइम ब्रांचने एक संयुक्त पथक स्थापन केलं आणि प्रकरणाचा खोल तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल फोन बंद ठेवला आणि शहरातून पळून गेला होत. त्यामुळे पोलिसांना त्याचं ठिकाण शोधणं मोठं आव्हान होतं. व्यापक टेक्निकल तपासणी आणि जमिनीवरील देखरेखीनंतर, क्राइम ब्रांचच्या पथकाने आरोपीला त्याच्या बिहारमधील मूळ गावाजवळ अटक केली.

    follow whatsapp