मुलीच्या छेडछाडीनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये तुफान राडा, लोखंडी सळ्यांसह दांडक्यांनी रिक्षांची तोडफोड

Meera Bhayandar Crime : मीरा-भाईंदर येथील काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे सोमवारी रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वादंग उसळलं होतं. याचे पडसाद 20 ऑक्टोबर रोजी मंगळवारी दिसून आले. काही लोकांनी काही लोकांच्या रिक्षांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचे काम केले आहे.

Meera Bhayandar Crime

Meera Bhayandar Crime

मुंबई तक

21 Oct 2025 (अपडेटेड: 21 Oct 2025, 04:42 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा परिसर हादरला

point

दगड, लोखंडी रॉडसह दांडक्यांनी रिक्षांच्या काचांची तोडफोड

point

नेमकं काय घडलं?

Meera Bhayandar Crime : मीरा-भाईंदर येथील काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे सोमवारी रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वादंग उसळलं होतं. याचे पडसाद 20 ऑक्टोबर रोजी मंगळवारी दिसून आले. काही लोकांनी काही लोकांच्या रिक्षांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचे काम केले आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana मध्ये 12 हजार 431 पुरुषांची घुसखोरी, राज्य सरकारच्या तिजोरीवर 'एवढा' आर्थिक भार

दगड, लोखंडी रॉडसह दांडक्यांनी रिक्षांच्या काचांची तोडफोड

घटनास्थळी उपस्थितांच्या माहितीनुसार, काही लोकांच्या हातात दांडके, लोखंडी सळ्या होत्या, तर काही लोक हातात दगड घेऊन आले आणि त्यांनी रिक्षांवर हल्ला करत सर्वच रिक्षांच्या काचांची तोडफोड केली. या एकूण घटनेमुळे स्थानिकांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. तेव्हा पोलिसांनी उपद्रव माजवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच डाचकुला परिसरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे काम केले. 

हे ही वाचा : शनिवार वाड्यात नमाज पठणावरून वादंग, मेधा कुलकर्णी रस्त्यावर, हिंदू संघटना एकवटताच गोमूत्राने केलं शुद्धीकरण

प्रताप सरनाईक काय म्हणले?

या एकूण प्रकरणावर राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, डाचकुला पाडा येथील गुन्हेगारीत वाढ होताना दिसते. बाहेरूनच बांगलादेशी, रोहिंग्या या ठिकाणी आल्याची शक्यता आहे. यावर आता पोलीसच कारवाई करतील, तसेच याच भागात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री केली जाते, अशी माहिती आहे. तसेच काही लोकांनी मुलींची छेड काढली, त्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे निर्देष देण्यात आले. 

    follow whatsapp