Govt Job: रेल्वेत 5800 हून अधिक पदांसाठी मोठी भरती! आजपासून अर्जाची प्रक्रिया सूरू... काय आहे पात्रता?

रेल्वेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून NTPC (एनटीपीसी) च्या नव्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रेल्वेत 5800 हून अधिक मोठी भरती!

रेल्वेत 5800 हून अधिक पदांसाठी मोठी भरती!

मुंबई तक

• 04:55 PM • 21 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रेल्वेत 5800 हून अधिक मोठी भरती!

point

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Govt Job:  रेल्वेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून NTPC (एनटीपीसी) च्या नव्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 21 ऑक्टोबर म्हणजेच आजपासूनच NTPC ग्रॅज्युएट स्तरावरील पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार या भरतीसाठी जाहिरात क्रमांक CEN06/2025 अंतर्गत अर्ज करू शकतात. 5000 हून अधिक पदांसाठी होणाऱ्या या भरतीमध्ये, उमेदवारांकडून अधिकृत वेबसाइट www.rrbapply.gov.in वर 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

हे वाचलं का?

‘या’ पदांसाठी भरती 

रेल्वे NTPC (एनटीपीसी) च्या या भरतीच्या माध्यमातून स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ट्रॅफिक असिस्टंट, चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवायझर, सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट अशा एकूण 5810 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत देखील सूट देण्यात येणार आहे.

वेतन: 25,500 रुपये ते 35,400 रुपये (याशिवाय इतर भत्ते देखील देण्यात येतील)

हे ही वाचा: Govt Job: भारत सरकारच्या 'या' कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी निघाली भरती अन् पगार 90,000 च्या पुढे..

कसा कराल अर्ज?  

  1. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. जर तुम्ही वेबसाइटवर आधीच नोंदणीकृत असाल तर थेट लॉगिन करा आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करा.
  3. जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर जा आणि तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करा.
  4. आता मिळालेल्या रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून वेबसाइटवर लॉगिन करा आणि भाग 1 मध्ये विचारल्याप्रमाणे तुमची वैयक्तिक माहिती भरा.
  5. भाग 2 मध्ये, शैक्षणिक पात्रता, पदाची पसंती, भाषा पर्याय इत्यादी निवडा.
  6. आता तुमचा फोटो आणि सही स्कॅन करा. त्यानंतर ते योग्य आकारात अपलोड करा.
  7. आता प्रवर्गानुसार, अर्जाचं शुल्क भरा आणि फायनल फॉर्म सबमिट करा.

अर्जाचं शुल्क 

एससी/ एसटी प्रवर्गातील उमेदवार तसेच, माजी सैनिक, पीडब्ल्यूबीडी, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा ईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 250 रुपये आणि इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 500 रुपये भरावे लागतील. भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 250 रुपये आणि इतर प्रवर्गातील लोकांना 400 रुपये परत केले जातील.

    follow whatsapp