Govt Job: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कडून 162 इंजिनीअरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशिअन-C पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. BEL कडून इंजिनीअरिंग असिस्टंट ट्रेनी पदाच्या एकूण 80 रिक्त जागांसाठी आणि टेक्निशिअन-C पदांच्या एकूण 82 जागांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 4 नोव्हेंबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
इंजिनीअरिंग असिस्टंट ट्रेनी पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा करणं आवश्यक आहे. यासोबतच, टेक्निशिअन-C पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे एसएसएलसी किंवा आयटीआय प्रमाणपत्र आणि अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे.
किती मिळेल वेतन?
इंजिनीअरिंग असिस्टंट ट्रेनी पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला 24,500 रुपये ते 90,000 रुपये वेतन देण्यात येईल. तसेच, टेक्निशिअन-C पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21,500 रुपये ते 82,000 रुपये वेतन मिळेल.
हे ही वाचा: तीन वर्षांच्या आजारी मुलीला तलावाजवळ सोडलं… मुलीचा दुर्दैवी मृत्यू! वडिलांविरोधात गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 28 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे सूट दिली जाईल.
हे ही वाचा: मुंबई: मित्रांसोबत पार्टी, 15 वर्षांची तरुणी बिअर प्यायली... नंतर, थेट ICU मध्ये दाखल! नेमकं काय घडलं?
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. या परीक्षेत जनरल अॅप्टिट्यूड आणि टीचिंग ट्रेड अॅप्टिट्यूड या विषयांवर अधारित 150 गुणांचे प्रश्न विचारले जातील.
जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 590 रुपये निश्चित करण्यात आलं आहे, तसेच एससी आणि एसटी आणि अपंग उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
