Crime News: दिवाळीला कमी बोनस मिळाल्याने संतप्त झालेल्या टोल कर्मचाऱ्यांनी धक्कादायक कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. या टोल कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आणि यात सामान्य जनतेचा मोठा फायदा झाला. खरंतर, आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेच्या फतेहाबाद टोलवर तैनात कर्मचाऱ्यांना कंपनीकडून प्रत्येकी 1100 रुपये बोनस मिळाला. कमी बोनस मिळाल्याने कर्मचारी संतापले आणि त्यांनी रागाच्या भरात टोल उघडला. याच कारणामुळे संपूर्ण महामार्ग काही तासांसाठी मोकळा झाला. या कृत्यामुळे कंपनीचं लाखो रुपयांचे नुकसान झालं. या घटनेबाबत कळताच तातडीने पोलिसांना याबाबतीत माहिती देण्यात आली.
ADVERTISEMENT
वाहने टोल टॅक्स न भरताच निघून गेली
त्यानंतर, पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. दोन तासांनंतरच टोलवरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्या दोन तासांत जवळपास 10,000 हून अधिक वाहने टोल टॅक्स न भरताच निघून गेली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईत घराचं स्वप्न महागलं! BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी... किंमत वाचून डोक्यालाच हात लावाल
कर्मचाऱ्यांना केवळ 1,100 रुपये बोनस...
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टोल प्लाझाची जबाबदारी ही श्री सैन अँड दातार कंपनी सांभाळत असल्याची माहिती आहे. या कंपनीने यावर्षीच मार्चमध्ये टोल चालवण्यास सुरुवात केली. मात्र, यंदाच्या दिवाळीसाठी कंपनीने टोल प्लाझावर काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ 1,100 रुपये बोनस दिला.
हे ही वाचा: नवी मुंबईत अग्नी तांडव, सोसायटीला लागलेल्या भीषण आगीत माय-लेकींचा मृत्यू; सर्वत्र धुराचे लोट
कर्मचाऱ्यांचं म्हणणं
या प्रकरणात कर्मचाऱ्यांनी असा दावा केला की वर्षभर कठोर परिश्रम करून सुद्धा त्यांना दिवाळीसाठी तुटपुंजे बोनस मिळाले आणि हे अपमानजनक आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने मार्चमध्ये हा टोल प्लाझा चालवण्याचं कंत्राट घेतलं आणि तेव्हा सुद्धा ते कर्मचारी काम करत होते, मग त्यांना अर्ध्या वर्षाच्या विलंबाचं कारण देत कमी बोनस कसा दिला जाऊ शकतो? सकाळची शिफ्ट सुरू होताच कर्मचाऱ्यांनी त्यांचं काम थांबवलं, बोनसचा निषेध केला आणि रागाच्या भरात टोलचे दरवाजे उघडले. काही मिनिटांतच, लांब रांगेत असलेली वाहने न थांबता मोकळ्या रस्त्यावर धावू लागली. जवळपास दोन तास टोल नाक्यावर एकही टोल वसूल करण्यात आला नाही.
ADVERTISEMENT
