मुंबईची खबर: मुंबईत घराचं स्वप्न महागलं! BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी... किंमत वाचून डोक्यालाच हात लावाल
प्रशासनाने 426 घरे लॉटरीच्या माध्यमातून विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही घरे अल्प उत्पन्न गटांतील लोकांसाठी आहेत. या घरांच्या लॉटरीसाठी 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करता येतील.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईत घराचं स्वप्न महागलं!

BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी...

किंमत जाणून थक्कच व्हाल
Mumbai News: मुंबई महानगरपालिकेने सर्वसामान्य लोकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उलल्याचं सांगितलं जात आहे. प्रशासनाने 426 घरे लॉटरीच्या माध्यमातून विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही घरे अल्प उत्पन्न गटांतील लोकांसाठी आहेत. या घरांच्या लॉटरीसाठी 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करता येतील. या लॉटरीमध्ये भायखळा येथे कमी उत्पन्न गटांतील लोकांसाठी 300 चौरस फूट घरांची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच, गोरेगाव पश्चिम येथील पिरामल नगरच्या स्वामी विवेकानंद मार्गाजवळ कमी उत्पन्न गटांसाठी 282 चौरस फूट घरांची किंमत 5.915 दशलक्ष रुपये आहे.
कधी होणार लॉटरी?
या घरांसाठी लॉटरीची प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होईल. यापूर्वी, 4,000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेला विकासकाकडून 20 टक्के प्रीमियम मिळत होता. महानगरपालिकेने नुकतंच त्यांच्या विकास नियंत्रण नियमांमध्ये सुधारणा केल्या असून प्रीमियमच्या ऐवजी घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. नियम 15 नुसार, 4,000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर बांधकाम करताना, महानगरपालिकेने 20 टक्के घरे कमी आणि अत्यंत अल्प उत्पन्न गटांना वाटली पाहिजेत. त्यानुसार, महानगरपालिकेला 426 घरे मिळाली. ही घरे लॉटरीच्या माध्यमातून विकली जाणार आहेत.
हे ही वाचा: मुंबई: रागाच्या भरात वडिलांचं निर्घृण कृत्य! 14 वर्षीय मुलीची जड वस्तूने हल्ला करत हत्या अन् पत्नी गंभीररित्या जखमी
कधीपर्यंत कराल अर्ज?
ही प्रक्रिया 16 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान राबवली जाईल. तसेच, या घरांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइट https://bmchomes.mcgm.gov.in वर अर्ज मागवले जात आहेत. ऑनलाइन अर्ज, विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू झाली आहे. अर्जदार 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकतात. अर्ज शुल्क आणि ठेवी 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 12:00 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. पात्र अर्जदारांची अंतिम यादी 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:00 वाजता जाहीर केली जाईल आणि लॉटरीची प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:00 वाजता होणार आहे.
हे ही वाचा: 7.5 कोटी कॅश, 2.5 किलो सोनं, महागड्या गाड्या; IPS अधिकाऱ्याच्या घरात घबाड सापडलं, काळं साम्राज्य कसं उभा केलं?
या लॉटरीबाबत माहिती आणि मदतीसाठी, 022-22754553 वर संपर्क साधावा किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधा तसेच, अर्जदार मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या सहाय्यक मालमत्ता आयुक्त कार्यालयाशी देखील संपर्क साधू शकतात.