Mumbai News: छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नवी मुंबई विमानतळाला कनेक्ट करण्याच्या दृष्टीने मेट्रो लाइन 8 बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (CIDCO) सोबत मिळून हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही लाइन पहिल्यांदाच नवी मुंबईच्या उपनगरांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि शहराची 'इंटरनल मेट्रो' मिळेल. नवी मुंबईतील या लाइनवर एकूण 11 स्थानके प्रस्तावित आहेत.
ADVERTISEMENT
मेट्रो लाइन 8 संदर्भात डिटेल्ड रिपोर्ट
महाराष्ट्र सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर, मेट्रो लाइन 8 संदर्भात एक डिटेल्ड रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रस्तावित मार्ग आणि स्थानकांबाबत माहिती आहे. मानखुर्द ते वाशी क्रीक ब्रिज ओलांडल्यानंतर, ही मार्गिका मेट्रो शीव-पनवेल हायवेशी कनेक्ट होईल. त्यानंतर, हा मार्ग नेरुळ, सीवूड्स आणि उलवे सारख्या परिसरातून जाईल आणि थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल. मेट्रो लाईन 8 चा आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) 337 किलोमीटरच्या मेट्रो नेटवर्कमध्ये समावेश झाला आहे.
हे ही वाचा: Govt Job: 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन्... कधीपर्यंत कराल अप्लाय?
प्रोजेक्टची जबाबदारी कोणाकडे?
सुरुवातीला हा प्रकल्प सिडको आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे राबवण्याची योजना आखली होती. मात्र, या प्रोजेक्टच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी आता सिडकोकडे सोपवण्यात आली आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत राबवला जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ हे 25 डिसेंबर रोजी सुरू होण्याची अपेक्षा असल्यामुळे मेट्रो 8 या परिसरातील ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे प्रवाशांना मुंबईहून नवी मुंबई विमानतळावर थेट प्रवेश करता येईल आणि दोन्ही विमानतळांमधील प्रवास जलद होईल.
11 स्थानकांचा समावेश
मेट्रो लाइन 8 साठी वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ सेक्टर 1, नेरुळ, सीवूड्स, बेलापूर, सागर संगम, तरघर/मोहा, NMIA पश्चिम आणि एनएमआयए टर्मिनल 2 (विमानतळ क्षेत्रातील दोन स्थानकांसह) ही 11 स्थानके प्रस्तावित आहेत.
हे ही वाचा: कणकवली : ईश्वरी राणे आणि सोहमची तरंदळे धरणात उडी मारुन आत्महत्या; WhatsApp चॅटनंतर टोकाचा निर्णय
कसा असेल रूट?
मानखुर्द ते नवी मुंबईत प्रवेश केल्यानंतर, ही मेट्रो शीव-पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा आणि जुईनगरमधून जाईल. नेरुळमधील एलपी जंक्शनपासून, मार्गिका आत वळेल आणि डॉ. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीजवळ एक प्रमुख स्थानक असेल. त्यानंतर हा मार्ग नेरुळ-सीवूड्स मार्गे उलवेकडे वळेल. तसेच, वंडर्स पार्क स्टेशन अपोलो हॉस्पिटल कॅम्पस आणि NMMC हेडक्वार्टरच्या मागून जाईल. सागर संगम आणि तरघर/मोहा स्टेशन वेगाने वाढणाऱ्या उलवे नोडला सर्व्हिस देतील. त्यानंतर मेट्रो एअरपोर्ट कॅम्पसमध्ये प्रवेश करेल आणि NMIA पश्चिम तसेच शेवटी NMIA टर्मिनल 2 वर थांबेल.
ADVERTISEMENT











