Mumbai News: गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सुविधांकडे विशेष लक्ष देत मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. आता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 22229/22230) तात्पुरती 8 डब्यांवरून 16 डब्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना प्रवासादरम्यान अधिक सुविधा मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
'या' 16 डब्यांसह धावेल
मुंबई सीएसएमटी ते मडगाव अशी गाडी क्रमांक 22229 वंदे भारत एक्सप्रेस आता 25, 27 आणि 29 ऑगस्ट रोजी 16 डब्यांसह धावेल. तसेच, मडगावहून मुंबई सीएसएमटीला परतणारी गाडी क्रमांक 22230 वंदे भारत एक्सप्रेस आता 26, 28 आणि 30 ऑगस्ट रोजी 16 डब्यांसह धावेल. या अतिरिक्त कोचच्या सुविधेमुळे प्रवाशांसाठी अधिक सीट्स उपलब्ध होतील आणि त्यांचा प्रवास आरामदायी होईल. या निर्णयामुळे प्रवाशांना, विशेषतः सणासुदीच्या गर्दीच्या वेळी, मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता लोकल ट्रेन अधिक वेगानं धावणार... पश्चिम रेल्वेकडून मोठी अपडेट
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली माहिती
ट्रेनसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय हा तात्पुरता बदल असल्याचं लक्षात ठेवून त्यानुसार प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केलं आहे. तिकीट बुकिंगमध्ये वाढलेल्या सीट्सचा फायदा घेऊन वेळेत आरक्षण करण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ही माहिती देताना सांगितलं की प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासन सतत प्रयत्नशील आहे आणि भविष्यातही प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य दिलं जाईल.
हे ही वाचा: 'त्या' सरकारी शाळेत 11 विद्यार्थीनींचं लैंगिक शोषण! नराधम मुख्याध्यापकाला ठोकल्या बेड्य, पोलिसांनी 'असा' केला पर्दाफाश!
राज्यभरात वंदे भारत एक्स्प्रेसची संख्य वाढताना दिसत आहे. 'वंदे भारत'ने मुंबई आणि मराठवाड्याला जोडण्यावर भर दिला आहे. यात जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत वाढवण्याचा आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेससोबत तिचं एकीकरण करण्याचा रेल्वे मंडळाने निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
