Mumbai News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं. या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झाल्यानंतर, मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो लाइन-3 च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. मोदींनी एअरपोर्टचं उद्घाटन केलं असून विमानतळाचं व्हर्चुएअल व्हिजिट केलं.
ADVERTISEMENT
डिसेंबर महिन्यात खुलं केलं जाणार
हे नवीन ग्रीनफील्ड विमानतळ अदानी ग्रुप सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत बांधण्यात आलं आहे. विमानतळाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ या वर्षीच डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या व्यावसायिक उड्डाणांसाठी खुलं केलं जाणार आहे.
बहु-विमानतळ प्रणालींच्या श्रेणीत मुंबईचा समावेश
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (NMIA) पहिला टप्पा 19650 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रोजेक्ट असून तो सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत विकसित केला गेला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) सोबत मिळून काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे वर्दळ कमी होणार असून आणि जागतिक बहु-विमानतळ प्रणालींच्या श्रेणीत मुंबईचा समावेश होणार असल्याची देखील माहिती आहे.
हे ही वाचा: चोरीच्या प्रकरणात जेलमध्ये, नागराज मंजुळेंच्या सिनेमात काम करण्यासाठी बाहेर आला, 'डँबिस बाबू'चा क्रूर अंत
मुंबई मेट्रो लाईन 3 (अॅक्वा लाईन) - महत्त्वाचा टप्पा
पंतप्रधान आचार्य अत्रे चौक ते कफ परेड पर्यंत विस्तारलेल्या मुंबई मेट्रो लाइन-3 च्या 2 B टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. मेट्रोच्या या मार्गिकेच्या निर्मितीसाठी जवळपास 12,000 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. यासोबतच, ते 37,270 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करुन बांधण्यात आलेली संपूर्ण मुंबई मेट्रो लाईन 3 (अॅक्वा लाईन) शहरी वाहतूक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. पंतप्रधान मोदींकडून 'मुंबई वन अॅप' देखील सुरु करण्यात येणार असून यामुळे बऱ्याच सार्वजनिक वाहतूक ऑपरेटर्सना एकात्मिक मोबाइल तिकीट सुविधेसह प्रवाशांना अनेक लाभ मिळतील.
हे ही वाचा: तीन महिलांसोबत केलं लग्न अन् तब्बल वर्षभरापासून आपल्याच मुलींसोबत घृणास्पद कृत्य... नेमकं प्रकरण काय?
पंतप्रधान महाराष्ट्रातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाच्या प्रमुख उपक्रम असलेल्या अल्पकालीन रोजगारक्षमता कार्यक्रमाचे (STEP) देखील उद्घाटन करतील. हा कार्यक्रम 400 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs) आणि 150 सरकारी तांत्रिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये सुरू केला जाईल तसेच रोजगार क्षमता वाढविण्यासाठी कौशल्य विकासाला उद्योगाच्या गरजांशी जोडण्याच्या दिशेने हा एक प्रमुख उपक्रम असणार आहे.
ADVERTISEMENT
