विरारमधील 18 मजली इमारतीत आढळले विद्यार्थ्यांचे मृतदेह, आत्महत्या की हत्या? पालक म्हणाले, 'आमची मुलं कधीच...'

Palghar : पालघर जिल्ह्यातील विरारच्या आगाशी परिसरात कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आले, संबंधित तरुणांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला याबाबत सविस्तर.

palghar crime

palghar crime

मुंबई तक

07 Oct 2025 (अपडेटेड: 07 Oct 2025, 04:47 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विरारमध्ये इमारतीत कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मृतदेह

point

उडी मारत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

Palghar : पालघर जिल्ह्यातील विरारच्या आगाशी परिसरात कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या एकूण माहितीनुसार, विरारच्या आगारी पूरपापाडा परिसरात अठरा मजली इमारतीचं बांधकाम सुरु आहे आणि याच इमारतीवरून तरुणांनी उडी मारत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. ही घटना 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालना : पत्नीच्या पोटात वाढत होतं बाळ, कंटेनरने धडक देत अख्ख कुटुंबच चिरडलं, अंगावर काटा आणणारा भीषण अपघात

नेमकं काय घडलं? 

घटनास्थळी इमरातीजवळ एक वॉचमन देखरेखीचं काम करत होता. त्याचक्षणी अचानकपणे मोठा आवाज झाल्याने तो बाहेर आला आणि त्यावेळी दोघांचेही मृतदेह त्याच ठिकाणी होते. दोघांचे मृतदेह त्याच ठिकाणी होते. या घटनेनं अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. 

मुलं आत्महत्या करूच शकणार नाहीत

मृतदेह आढळलेले दोन्ही विद्यार्थी नालासोपारा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येतंय. पोलिसांच्या तपासातून त्यांची माहिती आता समोर आली आहे. आदित्य सिंह आणि शान घेरुई अशी त्यांची नावं आहेत. हे तरुण बीएच्या शेवटच्या वर्षी शिकत होते. मुलांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आमची मुलं आत्महत्या करूच शकणार नाही, ही आत्महत्या नसून मुलांसोबत काही तरी घातपात केल्याचा आरोप तरुणाच्या आई वडिलांनी केला आहे. 

हे ही वाचा : मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्णय, हैद्राबाद गॅझेटिअरच्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

या प्रकरणात आता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजही तपासले असता, चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या तपासातून दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच समोर येईल. दरम्यान, तरुणांना खून करण्यात आली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही. 

    follow whatsapp