Maharashtra Weather: राज्यात हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

मुंबई तक

• 05:00 AM • 08 Oct 2025

Maharashtra Weather Today: राज्यात हवामान विभागाने 8 ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज जारी केला आहे. राज्यातील भारतीय विभागातील (IMD) अंदाजानुसार, राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हावामानाच्या एकूण अंदाजाबाबत महत्वाची अपडेट पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे. 

maharashtra weather (grok)

maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाचा 8 ऑक्टोबर रोजी 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज

point

'या' भागात येलो अलर्ट जारी

Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने 8 ऑक्टोबर रोजी पावसाचा अंदाज जारी केला आहे. राज्यातील भारतीय विभागातील (IMD) अंदाजानुसार, राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हावामानाच्या एकूण अंदाजाबाबत महत्वाची अपडेट पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'मराठी माझी मातृभाषा पण उर्दू..'अभिनेते सचिन पिळगांवरांचं विधान, नेटकरी काय म्हणाले?


कोकण : 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज जारी केला आहे. यापैकी पालघर, ठाणे या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तर रायगड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग  जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र : 

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर  या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिची चांगली असल्याचं हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच या भागात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. 

मराठवाडा : 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या दोन्ही जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच हिंगोली, नांदेड, या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच लातूर आणि  धाराशिव जिल्ह्यात हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह  पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

हे ही वाचा : चंद्रकांत पाटील म्हणाले तिला उचलायचं की नाही? आता गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया समोर

विदर्भ : 

विदर्भातील अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच इतर भागात हवामान विभागाने पावसाचा कसलाही अंदाज जारी केला नाही.