Govt Job: 10 वी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय तटरक्षक दल (इंडियन कोस्ट गार्ड) कडून मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 11 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
उमेदवारांना इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती होण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली असून या भरतीच्या माध्यमातून मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफमध्ये प्यून, पॅकर आणि ड्राफ्टी या पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.
काय आहे पात्रता?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तसेच, उमेदवारांकडे मोटर ट्रान्सपोर्ट पदासाठी हॅव्ही आणि लाइट मोटर वाहनाचं वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्यांना ड्रायव्हिंग मोटर वाहन चालवण्याचा 2 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. इतर पदांवर सुद्धा भरती होण्यासाठी संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय, लास्कर फर्स्ट क्लास पदासाठी बोटीत 3 वर्षांची सर्व्हिस असणं आवश्यक आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात.
हे ही वाचा: घरात घुसून महिलेवर थेट बलात्कार... पण, वाचण्यासाठी पीडितेने दिली चकित करणारी ऑफर! CCTV मध्ये सगळं कैद
वयोमर्यादा
मोटर व्हेहिकल ड्रायव्हर आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, लास्कर पदांसाठी उमेदवारांचं कमाल वय 30 वर्षे असणं अनिवार्य आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
हे ही वाचा: मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्णय, हैद्राबाद गॅझेटिअरच्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास नकार
कसा कराल अर्ज?
1. या भरतीमध्ये उमेदवारांना ऑफलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल.
2. अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशनमधून अर्जाचं प्रिंटआउट काढून घ्या.
3. यामध्ये इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा. त्यानंतर दिलेल्या जागेत उमेदवारांचा लेटेस्ट फोटो चिकटवा.
4. वैध ओळखपत्र, जन्मतारीख, पदवी/ पदव्यूत्तर/ 12 वी उत्तीर्ण/ डिप्लोमा मार्कशीट प्रमाणपत्र, जातीचा दाखला, 2 पासपोर्ट साइझ फोटो आणि 50 रुपयांचं पोस्टल स्टॅम्प दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
5. पत्ता: कमांडर, तटरक्षक दल क्षेत्र (A&N), पोस्ट बॉक्स क्रमांक 716, हड्डो (PO), श्री विजय पुरम 744102, अंदमान आणि निकोबार.
6. या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार इंडियन कोस्ट गार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
ADVERTISEMENT
