मुंबईची खबर: एमएमआर (MMR) मध्ये ट्रेस्पासिंग म्हणजेच अनधिकृतपणे रेल्वे रुळांवरून चालणे किंवा अतिक्रमण रोखण्यासाठी, मुंबई रेल विकास महामंडळाने एमयूटीपी 3 अंतर्गत 551 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र, तरी सुद्धा दरवर्षी अंदाजे 1,000 मृत्यू हे ट्रेस्पासिंगमुळे होत असल्याची माहिती आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत एमयूटीपी 3 चे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि यामध्ये 27 एफओबी, दोन एफओबी एक्सटेंशन, दोन लिंक वे, एक होम प्लॅटफॉर्म, सबवे आणि नाहूर ते मुलुंड दरम्यान फेसिंग म्हणजेच कुंपण घालणे, या कामांचा समावेश आहे. मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गांवर हे काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत बऱ्याच ट्रेस्पासिंगच्या घटना घडल्यामुळे याचा परिणाम रेल्वे वेळापत्रकावरही झाला आहे. याच कारणामुळे ट्रेस्पासिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
ADVERTISEMENT
अधिकृत आकडेवारीनुसार, 2014 ते 2024 या 10 वर्षांत 15,626 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच, 2020 मध्ये (कोरोनाचे वर्ष) 730 लोकांनी आपला जीव गमावला. परंतु तेव्हापासून म्हणजेच 2021 ते 2024 या काळात दरवर्षी 1000 ते 1200 लोकांना ट्रेस्पासिंग करताना आपला जीव गमवावा लागला असल्याचं दिसून आलं आहे.
हे ही वाचा: हॉटेलच्या छतावरून नग्न अवस्थेत खाली पडली तरुणी... पोलिसांनी ‘त्या’ खोलीत पोहोचताच पाहिलं धक्कादायक दृश्य!
अडीच ते तीन मीटर उंचीचा सबवे...
एमआरव्हीसीने आतापर्यंत 34 मिड सेक्शन लोकेशनवर ट्रेस्पासिंग रोखण्यासाठी काम केलं आहे. परंतु आता ते एफओबी, आरओबी आणि स्कायवॉकच्या जागी सबवे वापरण्याची योजना आखत असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण आजकाल लोकांना एफओबीवर 7 मीटर चढण्याची इच्छा नसते. तसेच, मिड सेक्शनमध्ये एस्केलेटर दिले जात नाहीत आणि जागेचीही समस्या आहे. त्यामुळे, अडीच ते तीन मीटर उंचीचा सबवे बांधला जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे लोकांना कमी पायऱ्यांच्या मदतीने एका बाजूने दुसऱ्या बाजूला प्रवास करता येईल. हा सबवे वॉटरटाइट असेल, त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
हे ही वाचा: पीएम मोदींच्या मुंबई दौऱ्याआधी 'गरीबी छुपाओ अभियान', झोपडपट्ट्या पडद्याने झाकल्या, काँग्रेसचा आरोप
एमआरव्हीसीचे एमडी काय म्हणाले?
एमआरव्हीसीचे एमडी विलास वाडेकर यांनी याबाबतीत माहिती देताना सांगितलं की, "आम्ही मध्य रेल्वेच्या साहाय्याने एक सर्वेक्षण केलं आहे. यादरम्यान, तीस नवीन ठिकाणे ओळखली गेली आहेत. आम्ही सबवेसाठी एक नवीन, आधुनिक डिझाइन विकसित करण्यासाठी तीन महिन्यांपासून काम करत आहोत." सध्या याचं काम अंतिम टप्प्यात आहे. हा फक्त पादचाऱ्यांसाठीचा भुयारी मार्ग असून पावसाळ्यात समस्या टाळण्यासाठी रुळाखालील हा भुयारी मार्ग जलरोधक असणार आहे. लवकरच यासंबंधी मध्य रेल्वेला प्रस्ताव सादर केला जाईल. या कामाबाबत मंजुरी मिळताच, ते रेल्वे निधी अंतर्गत एकत्रित काम पूर्ण केलं जाईल.
ADVERTISEMENT











