मुंबईची खबर: आता दीड तासांचा प्रवास केवळ 15 मिनिटांत! कल्याण-डोंबिवलीहून थेट नवी मुंबईत पोहोचाल...

मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमधील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून ऐरोली-कटाई एलिव्हेटेड रोड बांधला जात असून त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे.

कल्याण-डोंबिवलीहून थेट नवी मुंबईत पोहोचाल...

कल्याण-डोंबिवलीहून थेट नवी मुंबईत पोहोचाल...

मुंबई तक

• 05:07 PM • 06 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

आता दीड तासांचा प्रवास केवळ 15 मिनिटांत!

point

कल्याण-डोंबिवलीहून थेट नवी मुंबईत पोहोचाल...

Mumbai News: कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमधील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून ऐरोली-कटाई एलिव्हेटेड रोड बांधला जात असून त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. या प्रोजेक्टचं काम जवळपास 80 टक्के पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

दीड तासांचा प्रवास केवळ 15 मिनिटांत पूर्ण होणार 

सध्या, कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईत रस्ते मार्गाने पोहोचण्यासाठी किमान दीड तास वेळ लागतो. तसेच, ठाण्याहून प्रवास करताना वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवते. खरं तर, ट्रान्स हार्बर लोकल हा एकमेव जलद पर्याय आहे, परंतु वाढत्या प्रवासी वाहतुकीमुळे त्यावरही ताण वाढत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच, ऐरोली-कटाई नाका एलिव्हेटेड रोड प्रवाशांसाठी खुला केला जाणार असून या माध्यमातून हा प्रवास केवळ 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. 

हे ही वाचा: 14 वर्षीय तरुणी दाजीपासूनच राहिली गरोदर, जन्म होताच चार दिवसांनंतर नवजात बाळाचा मृत्यू अन् 'तो' फरार...

कसा असेल रूट? 

MMRDA ने ऐरोली-मुंब्रा प्रोजेक्टच्या विस्तारासाठी मुंब्रा-कटाई नाका एलिव्हेटेड रोड बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग देसाई खाडीवरून जाणार असून थेट कनेक्टीव्हिटीसाठी पारसिक डोंगरातून भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. 2018 मध्ये या मार्गाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. या प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूर रोड ते नॅशनल हायवे नंबर 4 पर्यंत 3.48 किमी लंबी उन्नत मार्ग बांधला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात ठाणे-बेलापूर मार्गिकेवर ऐरोली ब्रिजपासून एक कनेक्टिंग रोड बांधला जाणार आहे. 6.71 किमीचा मार्ग देसाई खाडीदेखील पार करणार आहे. 

हे ही वाचा: थिएटरच्या वॉशरूममध्ये महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट; अल्पवयीन तरुणाचं घाणेरडं कृत्य! पोलिसात तक्रार अन्...

या प्रकल्पातील बोगदा हा चार पदरी आहे आणि त्यामुळे ऐरोली ते डोंबिवलीजवळील कटाई नाका हा प्रवास सुलभ होईल. हा मार्ग खुला झाल्यानंतर, ऐरोली परिसरात जड वाहनांची वाहतूक कमी होईल. मुंबई ते कल्याण आणि कल्याण ते मुंबईला जाणाऱ्या गाड्या या एलिव्हेटेड रोडचा वापर करू शकणार आहेत. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरात ट्रॅफिक बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तसेच, प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. आता, MMRDA चा हा प्रोजेक्ट मुंबई मेट्रोपॉलिटन विभागात वाहतूक सेवेत मोठा बदल आणणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. 
 

    follow whatsapp