मुंबईची खबर: आता रात्री सुद्धा दुकाने राहणार खुली! प्रशासनाचा मोठा निर्णय अन् कामगारांना सुट्टी सुद्धा...

मुंबई तक

• 02:31 PM • 03 Oct 2025

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात दुकाने 24 तास खुली राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आता रात्री सुद्धा दुकाने राहणार खुली!

आता रात्री सुद्धा दुकाने राहणार खुली!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आता रात्री सुद्धा दुकाने राहणार खुली!

point

महाराष्ट्र प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai News: महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात दुकाने 24 तास खुली राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात श्रम विभागाकडून शासनादेश जाहीर केले आहेत. याअंतर्गत, दररोज दुकाने 24 तास खुली राहू शकतील. मात्र, दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यात 24 तासांची म्हणजेच एक दिवसाची सुट्टी देणं आवश्यक असल्याची अट निश्चित करण्यात आली आहे. बऱ्याच काळापासून दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेबाबत बराच गोंधळ झाला होता. मात्र, जीआर जाहीर झाल्यापासून ही बाब पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. 

हे वाचलं का?

'हा' फायदा होणार 

श्रम विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कित्येक वेळा दुकानदार आपली दुकाने अधिक काळ खुली ठेवण्यासाठी परवानगी मागतात. आता सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना सरकारी कार्यालयात अनावश्यक फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. 

दुकाने 24 तास खुली ठेवण्याचा हा निर्णय मुंबईसारख्या शहरांमध्ये गेमचेंजर ठरू शकतो. मात्र, यामध्ये बार आणि वाइन शॉपचा समावेश नसल्याचं देखील सांगितलं जात आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याकारणाने केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकाचं सुद्धा येथे 24 तास येणं-जाणं असतं. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी मार्केट बंद असल्यामुळे लोकांच्या खूप तक्रारी येत होत्या. 

हे ही वाचा: Govt Job: 'या' बँकेत निघाली मोठ्या पदांवर भरती! लाखोंचा पगार अन्... कसं कराल अप्लाय?

मुंबईतच जवळपास 10 लाख दुकाने

एकट्या मुंबईतच जवळपास 10 लाख दुकाने असल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी नाईट लाइफची मागणी बऱ्याच काळापासून वाढत असल्याचं पाहायला मिळतं. आतापर्यंत दुकाने 24 तास उघडी ठेवण्याबाबत कोणतीच स्पष्टता नव्हती. अनेक लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी, या मुद्द्यावर कोणतीच स्पष्टता नसल्याकारणाने रात्रीच्या वेळी दुकाने बंद करण्यात येत होती आणि याचा विरोध सुद्धा केला जात होता.

हे ही वाचा: आजीचं 35 वर्षीय तरुणावरच जडलं प्रेम! लपुनछपून दोघेही भेटायचे अन् एके दिवशी तर... प्रकरण थेट पोलिसात

मात्र 'या' अटी असतील 

2017 मध्ये सरकारने काही ठिकाणांना 24 तास खुले ठेवण्याबाबत सूट दिली नव्हती. यामध्ये परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्का पार्लर अशा दारू मिळणाऱ्या ठिकाणांसोबत थिएटरचा समावेश करण्यात आला होता. मात्र, 2020 मध्ये सरकारने थिएटर यामधून बाहेर काढलं होतं. त्यामुळे सरकारच्या अटींमध्ये समावेश असलेल्या ठिकाणी पूर्वी सारखेच नियम लागू असतील. अशी ठिकाणे 24 तास खुली राहू शकणार नाहीत.