Mumbai News: मुंबईतील लोकल ट्रेनसह मुंबई मेट्रोसुद्धा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. नुकतंच, प्रवाशांसाठी सुरू झालेल्या अंडग्राउंड मेट्रोला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, मुंबई मेट्रोला मिळणारा मुंबईकरांचा हाच प्रतिसाद कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण, सरकार आता मेट्रोचे दर वाढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
मेट्रो दर निर्धारण समिती
राज्य सरकारने केंद्र सरकारला मेट्रो दर निर्धारण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. यामुळेच, येत्या काही माहिन्यांत मेट्रोचे दर वाढणार असल्याची शक्यता आहे. मेट्रोच्या दरातील ही वाढ अंधेरी (पश्चिम)-दहिसर मेट्रो 2 A आणि गुंडावली-दहिसर मेट्रो लाइन 7 वर लागू होऊ शकते. एमएमआरडीए कडून मागील ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारकडे दर निर्धारण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. राज्य सरकारने मागील महिन्यातच या प्रस्तावाला मंजूरी देऊन केंद्र सरकारच्या साल्ट पॅन विभागाकडे पाठवलं होतं. केंद्र सरकारच्या या मंजूरीनंतर मुंबई हायकोर्टाच्या एका न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली जाणार आहे.
हे ही वाचा: Govt Job: 'या' तरुणांना भारतीय सैन्यात थेट भरती होण्याची संधी! केवळ मुलाखत अन्... काय आहे पात्रता?
मेट्रोचे सध्याचे दर...
सध्याच्या काळात, 'एमएमआरडीए'च्या मेट्रो 2 A, आणि 7 लाइन्सवर 3 ते 12 किमी अंतरासाठी 20 रुपये दर आहे. मेट्रोच्या या मार्गिकांमध्ये अंडरग्राउंड मेट्रोचे दर सर्वाधिक म्हणजेच 8 ते 12 किमी दूर अंतरासाठी 40 रुपये आहे. मेट्रो-1 वर सुद्धा 8 ते 11.8 किमी अंतरासाठी 40 रुपये दर आहे.
हे ही वाचा: मुंबई: तरुणीने कॅब बुकिंगसाठी डिटेल्स शेअर केले, पण काही दिवसांनंतर बरेच अश्लील कॉल्स अन् मॅसेजेस... नेमकं प्रकरण काय?
मेट्रोच्या 'या' मार्गिकांवरील दर वाढवण्याचा विचार
सध्या, एमएमआरडीए मेट्रो लाइन्सवर दररोज 3,00,000 हून अधिक प्रवासी प्रवास करतात. खरं तर, प्रोजेक्टच्या रिपोर्ट्सनुसार, पहिल्या वर्षी प्रवाशांची संख्या 9,00,000 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. प्रवाशांच्या प्रत्यक्ष संख्येतील मोठ्या तफावतीमुळे, मेट्रो मार्गिकांचं उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी आहे, मात्र खर्च सतत वाढत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या कारणामुळे, मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं सांगितलं जात आहे. दरातील ही तफावत आणि वाढत्या आर्थिक नुकसानीमुळे मेट्रो 2 A आणि 7 मार्गिकांवरील दर वाढवण्याचा प्रशासन गांभीर्याने विचार करत असल्याचं समोर येत आहे.
ADVERTISEMENT











