मुंबईची खबर: 'या' मार्गावरील डबल डेकर ब्रिजचं काम सुरू.... प्रवाशांचा प्रवास आणखी सोपा होणार!

आता डबल डेकर ब्रिजचं बांधकाम सुरू करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पूलाच्या दोन्ही बाजूंना अप्रोच रोड तयार करण्याचं काम जवळपास 60 टक्के पूर्ण झालं आहे.

'या' मार्गावरील डबल डेकर ब्रिजचं काम सुरू....

'या' मार्गावरील डबल डेकर ब्रिजचं काम सुरू....

मुंबई तक

• 04:48 PM • 25 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

'या' मार्गावरील डबल डेकर ब्रिजचं काम सुरू....

point

प्रवाशांचा प्रवास आणखी सोपा होणार!

Mumbai News: 125 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन ब्रिजच्या जागी आता डबल डेकर ब्रिजचं बांधकाम सुरू करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पूलाच्या दोन्ही बाजूंना अप्रोच रोड तयार करण्याचं काम जवळपास 60 टक्के पूर्ण झालं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सप्टेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. ब्रिजचं बांधकाम सुरू झाल्याने शिवडी वरळी कनेक्टरच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर अटल सेतूला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडण्याची सरकारची योजना देखील पूर्ण होणार आहे. 

हे वाचलं का?

'इतक्या' लांबीचा ब्रिज अन्...

एल्फिन्स्टन रेल्वे ब्रिजवर 500 मीटर लांबीचा पूल बांधला जात आहे. यामध्ये 132.2 मीटर लांबीचा रेल्वे ब्रिज असेल. तसेच, ब्रिजची रुंदी 12.1 मीटर असेल, अशी माहिती आहे. शुक्रवारी MMRDA चे कमिश्नर डॉ. संजय मुखर्जी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी आले होते.

हे ही वाचा:  भाऊबीजेच्या दिवशीच सख्ख्या बहिणीची चाकूने भोसकून हत्या! भावाने का केलं असं निर्दयी कृत्य?

प्रवाशांचा प्रवास सोपा होणार 

4.5 किमी लांबीच्या शिवडी-वरळी कनेक्टरचे काम 65 टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाल्याची माहिती आहे. खरंतर, कनेक्टरच्या मार्गात असलेल्या पुलाचं बांधकाम अपूर्ण असल्याने शिवडी-वरळी कनेक्टर प्रोजेक्ट रखडला होता. पण, आता एल्फिन्स्टन ब्रिजच्या जागी नव्या पूलाचं काम सुरू झाल्यामुळे 2026 पर्यंत प्रवाशांचा या मार्गावरील प्रवास सोपा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा: परदेशात पळून जाण्यापूर्वी निलेश घायवळने मामाच्या शेतात लपवलेली 'ती' गोष्ट, पोलिसांच्या हाती...

वाहतूक कोंडीत न अडकता प्रवास

अटल सेतुवरून येणाऱ्या गाड्या वेगाने वरळी पर्यंत पोहोचवण्यासाठी शिवडी-वरळी कनेक्टरचं बांधकाम सुरू आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रशासनाने अटल सेतू, वरळी-वांद्रे सी लिंक आणि कोस्टल रोड यांना एकमेकांशी जोडण्याची योजना तयार केली आहे. या कनेक्टरमुळे अटल सेतूवरील वाहने नवी मुंबईहून उपनगरांपर्यंत वाहतूक कोंडीत न अडकता प्रवास करू शकतील.

    follow whatsapp