आधी पत्नीला गोळी घातली, नंतर स्वत:ला गोळी झाडून संपवलं; मुलगा, सुनेला वेगळं राहण्यावरुन...

मुंबई तक

09 Jun 2025 (अपडेटेड: 09 Jun 2025, 08:18 AM)

राजमनोहर नांपल्ली याने आपली पत्नी लता (53) यांना गोळी मारली आणि त्यानंतर नंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सून आणि मुलाला वेगळं राहायचं होतं

point

याच मुद्द्यावरुन कुटुंबात सुरू झाला होता वाद

Worli Mumbai : मुंबईतील वरळीमधील सिद्धार्थ नगर परिसरात रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. एका 60 वर्षीय व्यक्तिने आपल्या पत्नीला गोळी घालून ठार केलं. त्यानंतर या व्यक्तिने स्वत:वरही गोळी चालवत आत्महत्या केली. ही घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका निवासी इमारतीत घडली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> राजा-सोनम हनिमून केस : गाईडने सांगितली थरारक घटनेची A टू Z माहिती, पोलिसांनीच...

नेमका काय वाद झाला होता?

राजमनोहर नांपल्ली याने आपली पत्नी लता (53) यांना गोळी मारली आणि त्यानंतर नंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांपल्ली आणि त्याची पत्नी लता यांच्यात शनिवारी संध्याकाळी कौटुंबिक वाद झाला होता. नांपल्ली यांचा मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत असताना, मुलासोबत स्वतंत्र राहण्याच्या मुद्द्यावरून सतत खटके उडत होते. या भांडणात लता आपल्या मुलाच्या बाजूने बोलत असल्याने नांपल्ली राजमनोहर होता. शनिवारी रात्रीही असाच वाद झाला, ज्याचा राग मनात ठेवून नांपल्लीने रविवारी सकाळी देशी पिस्तूलाने पत्नीवर गोळी झाडली आणि नंतर स्वतःला संपवले.

गोळीबाराच्या आवाजाने घरात एकच गोंधळ उडाला. नांपल्ली यांचा मुलगा आणि सून यांनी तातडीने पोलिसांना कळवलं. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी भारतीय दंड संहिता (भारतीय न्याय संहिता) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा >> जंगलात हनिमूनसाठी गेले, पण नवविवाहित जोडप्यासोबत घडलं सर्वात भयंकर! पोलिसांनाही बसलाय हादरा..

दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कौटुंबिक वादाचे इतके टोकाचे पाऊल उचलले जाणे धक्कादायक आहे.