Viral Video Police Van Mumbai : दिल्लीत काही दिवसांपासून नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन आता देशभर पसरू लागलं आहे. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कसलाही विचार न करता हल्ले केले, लाठीने मारहाण केली. अशातच मुंबईत काल 22 जुलै 2026 रोजी विद्यार्थी शिवाजी पार्कात जमले होते. तेव्हा त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याचे काही व्हिडिओ आता समोर येऊ लागले आहेत. पोलीस काही विद्यार्थ्यांना गाडीत घेऊन जात आहेत. तेव्हा याच गाडीची एका तरुणाने कडी खोलून विद्यार्थ्यांची सुटका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ हा चेंबूर येथील असल्याची शक्यता वर्तवण्यात येते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पोलिसांचा ड्रग्जप्रकरणी 'तो' व्हिडिओ, राज ठाकरेंनी धरलं धारेवर
व्हिडिओत नेमकं काय?
संबंधित व्हिडिओत एक मुंबई पोलीस गाडी विद्यार्थ्यांना घेऊन जाताना दिसत आहे. त्या पोलिसांच्या गाडीच्या बाहेर काही विद्यार्थी दिसून येत आहेत. त्यातील एक विद्यार्थीनी पोलिसांच्या गाडीत बसलेल्या मुलांशी बोलताना दिसत आहे. तेव्हा पोलीस व्हॅनचा वेग मंदावलेला दिसून येत आहे. याचाच फायदा घेत एका तरुणाने पोलीस व्हॅनची कडी खोलली आहे. नंतर गाडीतील तरुण खाली उतरले आहेत.
हे ही वाचा : 'तो' प्रश्न विचारताच आण्णा हजारे मुंबई Tak च्या मुलाखतीतून उठून गेले...
विद्यार्थी खाली उतरले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारने केलेल्या नीट पेपरफुटीनंतर आता विद्यार्थी देशभरात रस्त्यावर उतरले आहेत. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होते.
ADVERTISEMENT












