Cyber Crime: मुंबईतील दादरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने ऑनलाइन वस्तू विकण्याच्या प्रक्रियेत 1.5 लाख रुपये गमावले असल्याची बातमी समोर आली आहे. सायबर फसवणुकीचा ही आणखी एक नवीन घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेने काही दिवसांपूर्वी तिच्या मुलीची जुनी पुस्तके ऑनलाइन विकण्यासाठी एका प्रसिद्ध पोर्टलवर पुस्तकांचे फोटो आणि किंमतीसह इतर डॉक्यूमेंट्स अपलोड केले असल्याचं सायबर पोलिसांनी सांगितलं. तिने या सर्व वस्तूंची किंमत फक्त 13,800 रुपये ठेवली होती, जी प्रत्यक्ष किमतीपेक्षा खूपच कमी होती.
ADVERTISEMENT
QR कोड स्कॅन करण्यास सांगितलं
एफआयआरनुसार, पीडितेने पोर्टलवर तिची माहिती भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी, "जयकिशन बुक स्टोअर" मधील एका पुरूषाने तिच्याशी संपर्क साधला आणि पुस्तके खरेदी करण्याची ऑफर दिली. यावर महिलेने होकार दिला. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने महिलेला एक QR कोड पाठवला आणि तो स्कॅन करण्यास सांगितलं. तिने QR कोड स्कॅन करताच, तिच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये कापले गेले. जेव्हा ती महिला पैसे काढण्याबद्दल विचारपूस करण्यासाठी बँकेत गेली तेव्हा तिला ती सायबर फसवणुकीची बळी ठरली असल्याचं कळलं. त्यानंतर तिने दादर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: AI च्या मदतीने मित्राच्या पत्नीचे अश्लील फोटो बनवले अन् ब्लॅकमेल... पीडितेनं नेमकं काय केलं?
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती...
सायबर डीसीपी पुरुषोत्तम कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन व्यवहार करताना, कधीही अज्ञात व्यक्तींनी पाठवलेले क्यूआर कोड स्कॅन करू नका. फसवणूक करणाऱ्यांसाठी हा एक सोपा मार्ग बनला आहे. जर एखाद्या खरेदीदाराला तुम्हाला पैसे पाठवायचे असतील तर ते QR कोड स्कॅन न करता पैसे थेट तुमच्या खात्यात ट्रान्सफर करतील. सतर्क आणि सावध राहून या प्रकारची फसवणूक टाळता येते.
हे ही वाचा: प्रेयसीचा विनयभंग केल्याचा प्रचंड राग... संतापलेल्या प्रियकराने फिल्मी स्टाइलने घेतला बदला! नेमकं काय घडलं?
सायबर वकील प्रशांत गुरव यांनी सांगितल्याप्रमाणे, मुंबईत दररोज असे क्यूआर कोड पाठवून फसवणुक झाल्याची प्रकरणे समोर येत असून अशा घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. सायबर भामटे बऱ्याचदा खरेदीदार किंवा विक्रेते असल्याचं भासवून लोकांशी संपर्क साधतात, त्यांचा विश्वास संपादन करतात आणि नंतर त्यांनी फसवणूक करतात.
ADVERTISEMENT
