AI च्या मदतीने मित्राच्या पत्नीचे अश्लील फोटो बनवले अन् ब्लॅकमेल... पीडितेनं नेमकं काय केलं?
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) च्या मदतीने एका महिलेचे अश्लील फोटो बनवून आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल केलं आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

AI च्या मदतीने मित्राच्या पत्नीचे अश्लील फोटो बनवले

पीडितेला ब्लॅकमेल केलं अन् नंतर...
Crime News: आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) च्या मदतीने एका महिलेचे अश्लील फोटो बनवून आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल केलं आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीच्या लाहौरी गेट परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल केल्यानंतर तिने गुरुवारी (18 सप्टेंबर) पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या, पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात एफआयआर दाखल करून आरोपी तरुण, त्याची आई आणि बहिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे.
AI च्या मदतीने आक्षेपार्ह फोटो बनवला
मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीडित महिला ही आपल्या कुटुंबियांसह लाहौरी गेट परिसरात राहत होती. पीडितेने पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीचा मित्र अनीस सिद्दीकी नेहमी त्यांच्या घरात येत जात असायचा. अनीसने मागील वर्षीच सप्टेंबर मध्ये झालेल्या बर्थडे पार्टीमध्ये पीडितेसोबत एक फोटो काढला होता. त्यानंतर, आरोपीने तोच फोटो AI च्या मदतीने आक्षेपार्ह पद्धतीत बनवला.
अश्लीला फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
यावर्षी जून महिन्यात पीडितेचा पती घरी नसताना त्याचा आरोपी मित्र पीडितेच्या घरी आला. त्यानंतर, त्याने AI च्या मदतीने बनवलेला फोटो आणि व्हिडीओ पीडितेला दाखवला. त्याने हा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची तिला धमकी दिली आणि तिच्यासोबत वाईट कृत्य केलं.
हे ही वाचा: प्रेयसीचा विनयभंग केल्याचा प्रचंड राग... संतापलेल्या प्रियकराने फिल्मी स्टाइलने घेतला बदला! नेमकं काय घडलं?
पैसे आणि दागिन्यांची मागणी केली...
तसेच, पीडितेला ब्लॅकमेल करण्यासाठी आरोपीच्या आई आणि बहिणीने त्याला साथ दिली असल्याचा महिलेने आरोप केला. एडिट केलेल्या फोटो आणि व्हिडीओच्या साहाय्याने आरोपीने बऱ्याचदा पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर, आरोपीने पाच लाख रुपये आणि शंभर ग्रॅम सोन्याची मागणी केली. पीडितेने आरोपीची मागणी पूर्ण केली आणि त्याला रोख रक्कम तसेच सोनं दिलं. पण, तरीसुद्धा आरोपीने वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एडिट केलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले. पीडितेच्या पतीला आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटोज मिळाल्यानंतर त्याने यासंबंधी पत्नीशी बोलणं केलं आणि त्यानंतर पतीने पोलिसात एफआयआर दाखल करण्यास सांगितलं.