मुंबईची खबर: साठ्ये कॉलेजमध्ये खळबळ! इमारतीवरुन विद्यार्थीनीने मारली उडी; नेमकं कारण काय?

मुंबई तक

• 05:09 PM • 19 Jun 2025

मुंबईतील विलेपार्ले परिसरातील साठ्ये या प्रतिष्ठित कॉलेजमधल्या 21 वर्षीय विद्यार्थीनीने कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन स्वत:चं आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

साठ्ये कॉलेजमध्ये खळबळ! इमारतीवरुन विद्यार्थीनीने मारली उडी

साठ्ये कॉलेजमध्ये खळबळ! इमारतीवरुन विद्यार्थीनीने मारली उडी

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये तरुणीची आत्महत्या

point

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!

Mumbai News: मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरातील साठ्ये या प्रतिष्ठित कॉलेजमधल्या 21 वर्षीय विद्यार्थीनीने कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन स्वत:चं आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

हे वाचलं का?

घटनेमुळे कॉलेजमध्ये खळबळ

या 21 वर्षीचं मृत तरुणीचं नाव संध्या पाठक असून ती तिसऱ्या वर्षात शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याने कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यामुळे साठ्ये कॉलेजमध्ये खळबळ उडाली आहे. कॉलेजमध्ये या तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संध्याच्या आत्महत्येच्या चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

कॉलेज प्रशासनाची कुटुंबियांना माहिती

कॉलेजच्या प्रशासनाने संध्याच्या कुटुंबियांना तिने तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर संध्याला लगेच बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. विलेपार्ले पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. 

हे ही वाचा: पुण्यातील महिलेने लिपस्टिकने लिहिली चिठ्ठी अन्... पुणेकरांना हादरवून टाकणारी घटना!

पोलिसांचा तपास

प्राथमिक माहितीनुसार, संध्या ही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिने असं टोकाचं पाऊल का उचललं असावं? याचा पोलीस तपास करत आहेत. तपासादरम्यान, पोलीसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि यात संध्या तिसऱ्या मजल्याच्या कॉरिडोरमध्ये फिरताना दिसत आहे. 

हे ही वाचा: हात बांधून, तोंडात बोळा कोंबून 11 वर्षाच्या मुलांवर अत्याचार, बालकाश्रमातला शिपाईच... पुणे हादरलं

संध्याच्या कुटुंबियांचा संशय

संध्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे आणि त्यांना याबद्दल वेगळीच शंका वाटत असल्याचं समोर आलं आहे. संध्याने आत्महत्या केली नसून तिला कोणीतरी ढकललं असावं, असा संशय तिच्या कुटुंबियांकडून व्यक्त केला जात आहे.