गाडीतून सामान उतरवताना भरधाव कारने उडवलं, अपघातात 8 जण जागीच ठार, मृतांची नावं समोर

मुंबई तक

19 Jun 2025 (अपडेटेड: 19 Jun 2025, 08:38 AM)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम ढाब्याचे मालक सोमनाथ वायसे हे आपल्या ढाब्यासाठी फ्रिज पिकअप वाहनातून उतरवत होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिजायर कारने त्यांना जोरदार धडक दिली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील जेजुरी-मोरगाव रोडवर अपघात

point

अपघातात 8 जण जागीच ठार

point

श्रीराम ढाब्याचे मालक सोमनाथ वायसेंचाही मृत्यू

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भीषण अपघात घडले आहेत. त्यातच आता पुण्यातील जेजुरी-मोरगांव रोडवर भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू झालाय. बुधवारी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम ढाब्यासमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलं जखमी झाली आहेत.

हे वाचलं का?

ढाब्यासाठी आणलेलं फ्रिज गाडीतून उतरवत होते...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम ढाब्याचे मालक सोमनाथ वायसे हे आपल्या ढाब्यासाठी फ्रिज पिकअप वाहनातून उतरवत होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिजायर कारने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सात पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. मृतांपैकी एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह जेजुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत, तर जखमींवर जेजुरीतील शांताई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

हे ही वाचा >> सयाजीराजे वॉटर पार्कमधील राइडने घेतला बिझनेसमनचा जीव, फिरता पाळणा तुटला अन्...

मृतांची नावं:

1.सोमनाथ रामचंद्र वायसे - पुरंदर, पुणे

2. रामू संजीवनी यादव - पुरंदर, पुणे

3.अजय कुमार चव्हाण - उत्तम नगर, पुणे

4. अजित अशोक जाधव – पुणे

5. किरण भारत राऊत – इंदापूर, पुणे

6. अश्विनी संतोष एस.आर. – सोलापूर

7. अक्षय संजय राऊत –  बारामती, पुणे

8. एक अज्ञात  

हे ही वाचा >> 'बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री??', अजितदादांच्या नेत्याने Video शेअर करून वेळ साधली?

पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं की, अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थल गाठून क्रेनच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू केले. अपघातग्रस्त वाहनं हटवण्याचे प्रयत्न सुरू असून, अपघाताचं कारण आणि दोषींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. हा अपघात परिसरात चर्चेचा विषय बनला असून, रस्ता सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत.