Pune Bhigwan Case: भिगवण येथील तरुणीचं अपहरण करण्यात आल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. आज इंदापूर कोर्टात भिगवण अपहरण घटनेच्या संदर्भातील तारखेत महत्त्वाचा आणि कलाटणी देणारा निर्णय झाला असून कोर्टाने मुलीच्या इच्छेनुसार मुलीला आईकडे सुपूर्त करण्याचे आदेश दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणातील मुलीने आता आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
कोर्टात नेमकं काय घडलं?
कोर्टाच्या सुनावणीनंतर मुलीच्या आईच्या बाजूने कोर्टात युक्तीवाद करणाऱ्या वकिलांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "भिगवण येथील मुलीचं अपहरण करण्यात आल्याच्या प्रकरणी मुलीच्या आईच्या मार्फत वकीलपत्र दाखल करुन आम्ही तिथे हजर झालो. त्यावेळेस संबंधित मुलीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला तिची संमती विचारली असता, तिने आई आणि तिच्या मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्या अनुषंगाने कोर्टात मुलीचा ताबा तिच्या आई आणि मामाकडे देण्याचा आदेश पारित केला आहे."
पुढे ते म्हणाले की, "आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. पण सध्या मुलगी सुधारगृहात असून पुढील आदेश आल्यानंतर तिला तिच्या आई आणि मामाच्या ताब्यात देण्यात येईल."
हे ही वाचा: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात डीसीपींसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
खरं तर, लग्नासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना भिगवण येथे एका तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र या प्रकरणाला नंतर मोठा ट्विस्ट मिळाला. संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यात तिने अपहरण झाल्याचा आरोप फेटाळून लावत संबंधित तरुणासोबत आपल्या मर्जीने गेल्याचं सांगितलं. आता, या प्रकरणाचा वेगळीच कलाटणी मिळाली असून संबंधित तरुणीने आपल्या आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT











