शिवराज मोटेगावकरच्या पुण्यातील RCC कॅम्पसवर बुलडोझर कारवाई सुरुवात, दोन मालमत्ता सील

Bulldozer action starts at Shivraj motegaonkar's RCC Pune Campus : नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या पुण्यातील 'आरसीसी' (RCC) कॅम्पसवर थकीत मालमत्ता कर आणि अनधिकृत बांधकामामुळे महापालिकेने बुलडोझर कारवाई सुरू केली आहे.

Bulldozer action starts at Shivraj motegaonkar's RCC Pune Campus

Bulldozer action starts at Shivraj motegaonkar's RCC Pune Campus

मुंबई तक

20 May 2026 (अपडेटेड: 20 May 2026, 01:47 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवराज मोटेगावकरच्या पुण्यातील RCC कॅम्पसवर बुलडोझर कारवाई

point

दोन मालमत्ता केल्या सील

Bulldozer action starts at Shivraj motegaonkar's RCC Pune Campus : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात अडकलेल्या शिवराज मोटेकरगावकर याच्या पुण्यातील RCC कॅम्पसवर बुलडोझर कारवाईला सुरुवात झाली आहे. नीट प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शिवराज मोटेगावकर याला ताब्यात घेतल्यानंतर, पुणे महानगरपालिकेने मोटेगावकर यांच्याशी संबंधित दोन मालमत्ता सील केल्या आहेत. त्यांच्या आरसीसी (RCC) क्लासेसच्या पुणे परिसरातील कॅम्पसवर थेट बुलडोझर कारवाईला सुरू केली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पुणे : आंदेकर टोळीने पुन्हा सूड उगवला, गोळीबार करुनच थांबले नाहीत, कोयत्यानेही वार

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, थकीत मालमत्ता कर आणि व्यावसायिक जागेचा कथित अनधिकृत वापर केल्याप्रकरणी ही धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.  अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुण्यात मोटेगावकर यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या 'आरसीसी क्लासेस'च्या या आवारातून जेईई (JEE) आणि नीट (NEET) च्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस चालवले जात होते. या मालमत्तांवर तब्बल 3.20 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता, ज्याची वसुली न झाल्यामुळे अखेर पालिकेने ही मोठी कारवाई करण्याचे आदेश जारी केले.

हेही वाचा : महाराष्ट्र : फाजिलाचा पुरलेला मृतदेह उकरला, पोस्टमॉर्टेमने सगळं उघडकीस

या अधिकृत आदेशांनुसार कारवाई करत पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने जे. एम. रोड (JM Road) वरील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील दुकान क्रमांक 1 ला रीतसर सील ठोकले आहे. आवश्यक परवानग्या न घेता या ठिकाणी कोचिंग क्लासेस चालवले जात असल्याचे नोटीसमध्ये नमूद करून पालिकेने संबंधित जागा सील केली आहे. शिवराज मोटेगावकर यांचा हा प्रसिद्ध 'आरसीसी क्लासेस'चा कॅम्पस जे. एम. रोडवरील बोरावके बिल्डिंग (Borawake Building) मध्ये स्थित आहे, जिथे हजारो विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांचे शिक्षण घेत होते. मात्र, सीबीआयच्या कारवाईनंतर आता स्थानिक प्रशासनानेही मोटेगावकर यांच्या अवैध व्यावसायिक उपक्रमांवर कडक कायदेशीर बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, संबंधित बोरावके इमारतीमध्ये केवळ कराचीच थकबाकी नव्हती, तर इमारतीच्या मूळ आराखड्यात अनेक गंभीर बदल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान या इमारतीमध्ये बेकायदेशीर पार्किंग (Illegal parking alterations) आणि मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेच्या पथकाला आढळून आले. याच कारणांमुळे महापालिकेने तातडीने घटनास्थळी पोलीस बंदोबस्तात बुलडोझर आणून अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली. 

मोटेगावकर यांच्या पुण्यातील इतर मालमत्तांचीही होणार चौकशी

दरम्यान, पुणे महानगरपालिकेने केवळ जे. एम. रोडवरील या कॅम्पसपुरतीच आपली कारवाई मर्यादित ठेवलेली नाही. मनपा प्रशासनाने शिवराज मोटेगावकर यांच्याशी संबंधित पुणे शहरातील इतर सर्व मालमत्तांची आणि जागांची सखोल चौकशी (Inquiry) सुरू केली आहे. मोटेगावकर यांच्या इतर मालमत्तांवरही कर थकीत आहे का? किंवा तिथेही काही अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे का? याचा शोध महापालिकेचे संबंधित विभाग घेत आहेत.