महाराष्ट्र : फाजिलाचा पुरलेला मृतदेह उकरला, पोस्टमॉर्टेमने सगळं उघडकीस
Nagpur Crime : नागपूरमध्ये लग्न झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच फाजिला झबीन शेख या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, सासरच्यांनी हृदयविकाराचा बनाव रचल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र : नवविवाहितेचा पुरलेला मृतदेह उकरला
पोस्टमॉर्टेमने सगळं उघडकीस
Nagpur Crime : नागपूर शहरातूनही हुंडाबळी आणि घरगुती हिंसेची एक अत्यंत थरारक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच फाजिला झबीन शेख या नवविवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ केल्याचं समोर आलंय. दरम्यान, तिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिच्या पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात..
हेही वाचा : पुणे हादरलं, वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या, बस स्टॉपवर गोळीबार
अमरावती येथील रहिवासी असलेल्या फाझिला हिचे लग्न याच वर्षी जानेवारी महिन्यात नागपूरच्या बोरियापुरा येथील रहिवासी जुबेर शेख याच्याशी झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ सर्व काही व्यवस्थित आणि सामान्य सुरू होते, परंतु त्यानंतर सासरच्या मंडळींकडून हुंड्याची मागणी करत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू करण्यात आला. दरम्यान, सतत छळ होत असताना अखेर फाझिलाच्या मृत्यू झाला. सासरच्या लोकांनी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (हार्ट अटॅक) झाल्याचा बनाव रचला होता, मात्र मुलीच्या कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे या खऱ्या कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे.
हेही वाचा : प्रदीपशी प्रेमविवाह केला, पण आयुष्य वेदनादायी बनलं, ऐश्वर्याचा कशामुळे झाला मृत्यू?
या संपूर्ण प्रकरणातील अत्यंत हृदयद्रावक आणि महत्त्वाचा दुवा म्हणजे, 15 मे रोजी फाझिलाने आपल्या आईला फोन केला होता. या शेवटच्या फोन कॉलवर ती ढसाढसा रडत होती आणि तिने अत्यंत घाबरलेल्या आवाजात, "मला वाचवा… मला काहीही होऊ शकते…" असे शब्द उच्चारले होते. या धक्कादायक संभाषणाच्या काही वेळातच तिचा मोबाईल फोन अचानक बंद झाला आणि त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्या मृत्यूची बातमी दिली. जेव्हा मृत मुलीचे आई-वडील नागपूरला पोहोचले, तेव्हा सासरच्या लोकांनी सुरुवातीला मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यास स्पष्ट नकार दिला. नंतर नातेवाईकांच्या दबावामुळे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी अमरावती येथे नेण्यात आला. तिथे दफनविधीपूर्वी अंत्यसंस्काराचे धार्मिक स्नान घालत असताना, मुलीच्या कुटुंबीयांना फाझिलाच्या गळ्यावर गंभीर जखमांचे आणि आवळल्याचे काळे निळे निशाण आढळून आले, ज्यामुळे तिची हत्या करण्यात आल्याची त्यांची शंका अधिक गडद झाली.
थडग्यातून बाहेर काढला मृतदेह; पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा
मृत फाजिलाचा भाऊ मोहम्मद आवेश अब्दुल हसन याने या छळाविरुद्ध आणि हत्येच्या संशयाबाबत तातडीने पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत कायदेशीर प्रक्रियेनुसार फाझिलाचा दफन केलेला मृतदेह पुन्हा एकदा थडग्यातून (कब्र) बाहेर काढण्यात आला आणि त्याचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पुन्हा शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करण्यात आले. या प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सासरच्यांचा हार्ट अटॅकचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून, फाझिलाचा मृत्यू दम भरल्याने म्हणजेच श्वास रोखल्याने झाल्याची अधिकृत पुष्टी झाली. या धक्कादायक अहवालानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकण्यास सुरुवात केली.









