भारतात लवकरच बुलेट ट्रेन, 48 मिनिटांत मुंबई-पुणे अंतर कापणार

मुंबई तक

01 Aug 2026 (अपडेटेड: 01 Aug 2026, 07:36 PM)

India's First Bullet Train : भारतात बुलेट ट्रेनची सुरूवात झाली नसून देशात आधीच सात कॉरिडोरचं प्लानिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2026-27 या वर्षासाठी 4 हजार किमी अंतरासाठी हाय स्पीड रेल कॉरिडोरची घोषणा केली. केंद्र सरकार आता या सातही मार्गांचे बांधकाम लवकरच करणार आहे.

India's first bullet train

India's first bullet train

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भारतातील बुलेट ट्रेनचे मार्ग 

point

मुंबई-पुणे 48 मिनिटांत अंतर कापणार

India's Bullet Train : भारतात बुलेट ट्रेनची सुरूवात झाली नसून देशात आधीच सात कॉरिडोरचं प्लानिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2026-27 या वर्षासाठी 4 हजार किमी अंतरासाठी हाय स्पीड रेल कॉरिडोरची घोषणा केली. केंद्र सरकार आता या सातही मार्गांचे बांधकाम लवकरच करणार आहे. कमी खर्चात उत्तम प्रकारे आराखडा विकसित करणार आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सांगली: 4 वर्षाच्या मुलीवर 46 वर्षीय पुरूषाकडून अत्याचार, खून करत पेटीत भरला मृतदेह

भारतातील बुलेट ट्रेनचे मार्ग

भारतातील प्रस्तावित असलेल्या नवीन बुलेट ट्रेनच्या कॉरिडर मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी, देशाच्या उत्तर पश्चिमहून उत्तर-पश्चिमपर्यंत पसरला आहे. हा मार्ग आर्थिकदृष्ट्या जोडला जाणार आहे. 

मुंबई ते पुण्याचा प्रवास 48 मिनिटांपर्यंत

या कॉरिडोरच्या निर्मितीमुळे प्रवासासाठी एक क्रांतिकारी बदल घडणार आहे. मुंबई ते पुण्याचा प्रवास आता फक्त 48 मिनिटांपर्यंत, पुणे ते हैदराबाद 1 तास मिनिटे, हैदराबाद ते बंगळुरू अंदाजे 2 तास, चेन्नई ते बंगळुरू 1 तास 13 मिनिटे, हैदराबाद ते चेन्नई 2 तास 55 मिनिटे, दिल्ली ते वाराणसी 3 तास 50 मिनिटांची संभावणा आहे.  तर वाराणसी ते सिलिगुडी हे अंतर पाटणामार्गे 2 तास 55 मिनिटांचा कालावधीची शक्यता आहे. 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, या कॉरिडोरमुळे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अहमदाबाद प्रकल्पातून मिळालेल्या धड्यांचा आधार घेऊन उड्डाणपूल, पूल, बोगदे आणि स्थानिकांसाठी एक प्रामाणिक डिझाईन केलेली लायब्ररी विकसित करत आहेत. सिद्ध मॉड्युलर डिझाइनचा वापर केल्याने प्रत्येक कॉरिडोरसाठी पायाभूत सुविधांची पुनर्रचना करण्याची अधिकची गरज नाहीशी होतेय. परिणामी अधिक जलद अंमलबजावणी, कमी खर्च सातत्याने गुणवत्ती आणि सुलभ देखभालीची शक्यता आहे. 

बुलेट ट्रेन प्रकल्पातून 508 किमी लांबीचा मुंबई-अहमदाबाद कॉरिडोर

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पातून म्हणजेच 508 किमी लांबीचा मुंबई-अहमदाबाद कॉरिडोर मिळालेल्या धड्यांच्या आधारे प्रत्येकी भविष्यातील कॉरिडोरची रचना केली जात आहे. सुरत आणि बिलिमोरा दरम्यानचा हा पहिला 47 किमीचा विभाग हा 15 ऑगस्ट रोजी खुला केला जाणार आहे. नंतर 2018 मध्ये ठाणे-अहमदाबाद विभाग खुला केला जाणार आहे. 

हे ही वाचा : र्ग सुरू असतानाच मुख्याध्यापकाने काढली पँट, विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे

सात बुलेट ट्रेनच्या मार्गांपैकी चार मार्गांच्या प्राथमिक प्रकल्प आराखड्याला मंजुरी देण्यात आली. तर उर्वरित तीन मार्गांसाठी जमीन आणि पर्यावरणीय तपासणी सुर करण्यात आलीय. अहवाल, खर्च आणि अर्थसंकल्पीय व्यवस्था निश्चित झाल्यानंतर कोणत्याही मार्गावरील संपूर्ण कामाला सुरूवात होईल. तसेच सर्वच मार्गांवर खडीमुक्त रूळ तयार करण्यासाठी जपानच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.