बारामती : टेम्पोनं स्कूटरला 150 फूट फरफटत नेलं, भीषण अपघातात 3 भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

07 Jun 2026 (अपडेटेड: 07 Jun 2026, 04:45 PM)

Pune Accident : पुणे जिल्ह्यातील बारामतीत आयशर टेम्पो आणि स्कूटरमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात तीन सख्ख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मोरगाव-नीरा राज्यमहामार्गावरील चौधरी गावानजीक घडला.

Pune accident

Pune accident

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आयशेर टेम्पोची स्कूटरला धडक 

point

उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

Pune Accident : पुणे जिल्ह्यातील बारामतीत आयशर टेम्पो आणि स्कूटरमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात तीन सख्ख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मोरगा-नीरा राज्यमहामार्गावरील चौधरी गावानजीक घडला. या दोन बहिणी आणि एका भावाचा दुर्दैवी अंत झाला. तर त्यांच्यासोबत असलेला एक लहान मुलगा दुर्दैवी जखमी झाला. या घटनेनं परिसरात एकच घबराट पसरली आणि राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत राहिल्याची बातमी आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुणी ट्रायलरूममध्ये कपडे बदलत होती, दुकान मालकाच्या मुलानं फोनद्वारे रेकॉर्ड..

आयशेर टेम्पोची स्कूटरला धडक 

घडलेल्या घटनेनुसार, सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गुलंचेपासून दोन किमी अंतरावर, नीरा-मोरगाव राज्यमहामार्गावरील सोमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका आयशेर टेम्पोने स्कूटरला 150 फूट अंतरावर फरफटत नेले, हा अपघात इतका भीषण होता करी, स्कूटर चालवणाऱ्या दोन मुलींच्या हाता-पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत देखील झाली होती, ज्यात त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. 

उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

मात्र, या भीषण झालेल्या अपघातात तिचा भाऊ गंभीरपणे जखमी झाला असून त्याला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयशर टेम्पो चालकाने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.  

हे ही वाचा : लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आईने 5 वर्षाच्या मुलीसोबत नको तेच... लाज आणणारा प्रकार

अशातच गावकरी अनेक वर्षांपासून गतिरोधकाची मागणी करत आहेत. गेल्या काही वर्षात येथे चार ते पाच अपघात झाले असून, ज्यात काही जण अधू झालेत. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.