पत्नीच्या त्रासाला कंटाळला, व्हिडीओ शूट करुन पतीने स्वत:ला संपवलं, व्हिडीओमध्ये काय म्हटलंय?

मृत तरुणाचे नाव सूरज दामोदर पवार असं आहे. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. पत्नी मयुरीकडून सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून सूरजने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने छताच्या अँगलला...धक्कादायक घटना

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:00 PM • 05 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील धक्कादायक घटना

point

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने स्वत:ला संपवलं

Pune News : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरातील कोरेगांवमूल येथे एका तरुणानं पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मृत तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाइलवर एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये तरूणाने आपल्या व्यथा मांडल्या होत्या. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी मृत तरुणाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> भरधाव कार बंगल्याला धडकली, 5 जण जागीच ठार, लग्नावरुन येताना काळाचा घाला, नेमकं काय घडलं?

मृत तरुणाचे नाव सूरज दामोदर पवार असे आहे. हा 32 वर्षीय तरूण हवेलीतील कोरेगावमूलचा रहिवासी आहे. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. सूरजचे वडील दामोदर निवृत्ती पवार (वय 60, रा. वाल्हे, वागदरवाडी, ता. पुरंदर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

छताच्या अँगला साडी बांधून गळफास घेतला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज पवार आणि मयुरी जाधव यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. हे दांपत्य कोरेगांवमधील इनामदार वस्ती परिसरात राहत होते. बुधवारी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती आहे. पत्नी मयुरीकडून सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून सूरजने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने छताच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या मोबाइलवर व्हिडिओ शूट केला, ज्यामध्ये त्याने पत्नी मयुरीकडून होणारा मानसिक त्रास, भांडणे आणि मारहाण यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा >> Mumbai: लग्नात तब्बल 4.75 कोटींचे दागिने दिले, तरी सुनेला...

पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल


या घटनेनंतर सूरजच्या कुटुंबीयांनी मयुरी पवार ऊर्फ मयुरी अनिल जाधव (वय 26) हिच्यावर सूरजच्या आत्महत्येस कारणीभूत ठरण्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मयुरीविरुद्ध भादंवि कलम 108, 118(1), 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp