सरकारी नोकरीसाठी Vacancy, 22 लाख रुपये पगार मिळणार!

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडवांस्ड कंप्यूटिंग (C-DAC) कडून मोठ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया आणि अर्जाची शेवटची तारीख.

कंप्यूटर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी निघाली बंपर भरती

कंप्यूटर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी निघाली बंपर भरती

मुंबई तक

• 04:22 PM • 04 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कंप्यूटर आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात नोकरीची संधी

point

C-DAC कडून मोठ्या पदांसाठी भरती

point

काय आहे पात्रता आणि अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

Govt Job: सध्याच्या काळात, बऱ्याच तरुणांचा कंप्यूटिंग आणि टेक्नॉलॉजिकल क्षेत्रात शिक्षण घेऊन त्याच क्षेत्रात नोकरी करण्याकडे कल असतो. जर तुम्हाला कंप्यूटर आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल या क्षेत्रातील नव्या सरकारी भरतीची बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडवांस्ड कंप्यूटिंग (C-DAC) कडून मोठ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

ही भरती प्रोजेक्ट इंजिनीयर, प्रोजेक्ट मॅनेजर आणि यासोबत बऱ्याच पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार www.cdac.in या C-DAC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

पात्रता

शैक्षणिक पात्रता: या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे या क्षेत्रातील शिक्षण घेतल्याची डिग्री असणं आवश्यक आहे. पदानुसार उमेदवाराकडे बी.टेक (B.Tech) / बीई (B.E), एमएससी (MSc), एमई (M.E), एम.टेक (M.Tech), एमसीए (MCA) आणि एम.फिल (M.Phil) / पीएचडी (PhD) यापैकी आवश्यक डिग्रीचं प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. 

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 35 वर्षे असावे. तर कमाल वय 56 वर्षे असावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाईल.

हे ही वाचा: वैष्णवीनंतर आशाराणीनेही स्वत:ला संपवलं! सोलापुरातील संतापजनक घटना, मुलीचे वडील म्हणाले...

वेतन

या पदावरील कर्मचाऱ्यांचं वेतन तितकंच चांगलं आणि आकर्षक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 4.49 लाख ​रुपये ते 22.9 लाख रुपयांपर्यंत पॅकेज दिलं जाईल. 

परीक्षेचं स्वरूप

उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीच्या आधारे म्हणजेच त्यांच्या कामाच्या आकलनाची आणि तांत्रिक ज्ञानाची चाचणी करून केली जाईल. ही चाचणी संगणक म्हणजेच कंप्यूटरवर घेतली जाईल. यामध्ये तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जातील.

हे ही वाचा: मित्रांसमोर खोटं लग्न, रिसॉर्टचं काम सांगून पैसे घेतले आणि... मॅट्रिमोनिअल साईटवर विधवा महिलेसोबत भयानक प्रकार

अर्जाची प्रक्रिया

सर्वप्रथम www.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर होमपेजवर दिलेल्या 'Careers' सेक्शनमध्ये जाऊन 'Registration Form' लिंकवर क्लिक करा. आता 'New Registration' वर क्लिक करुन आपलं रजिस्ट्रेशन करुन घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा. नंतर डॉक्यूमेंट्स अपलोड करुन अर्ज सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्या.


 

    follow whatsapp