Pune Crime : पुण्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. अशातच आता आयटी हब ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील हिंजवडीत प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय तरुणीवर चॉपरने हल्ला करत संपवल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात तिचा प्रियकर योगेश भालेराव, प्रेम लक्ष्मण वाघमारे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..', 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
तरुणी आणि आरोपी योगेश हे दोघेही प्रेमसंबंधात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी योगेश हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते. योगेश हा विवाहित असून जेव्हा पत्नीला त्याच्या नात्याबद्दल कळाले तेव्हा ती घर सोडून निघून गेली. आरोपीने 18 वर्षीय तरुणीवर लग्न करण्यासाठी दबाव आणला होता. तेव्हा योगेशला समजले की तरुणीचंही दुसऱ्याच तरुणासोबत प्रेमसंबंध आहे. यामुळे आता योगेश संतापून गेला होता.
हिंजवडीत मैत्रिणीवर चॉपरने वार
शनिवारी दुपारी 4:15 वाजताच्या सुमारास योगेशने दोन मित्रांसह हिंजवडीतील साखरे वस्ती येथे त्याच्या मैत्रिणीवर चॉपरने वार केले. यामुळे पीडितेच्या हातावर, तोंडावर जखमा झाल्या. तसेच शरीरातील इतर भागांना दुखापत देखील झाली होती. संबंधित प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला ताबडतोब जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा : धाराशिव-जळगाव महामार्गावर गाड्या बंद पाडून लुटणारी टोळी अखेर गजाआड, पोलिसांनी 'असा' रचला सापळा
दरम्यान, पीडितेची प्रकृती ही सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सहाय्यक आयुक्त कुऱ्हाडे आणि पोलीस निरीक्षक बालाजी पंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला ताबडतोब ताब्यात घेण्यात आले होते.
ADVERTISEMENT











