अजून मिळाली का नाही माझी पत्नी? सातत्याने पोलिसांना विचारणा केल्यानं दृश्यम स्टाईल कांड समोर आलं, पुण्यात खळबळ

Pune Crime : अजून मिळाली का नाही माझी पत्नी? सातत्याने पोलिसांना विचारणा केल्यानं दृश्यम स्टाईल कांड समोर आलं, पुण्यातील घटनेने खळबळ

Pune Crime

Pune Crime

मुंबई तक

10 Nov 2025 (अपडेटेड: 10 Nov 2025, 09:13 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"अजून मिळाली का नाही माझी पत्नी?"

point

सातत्याने पोलिसांना विचारणा केल्यानं दृश्यम स्टाईल कांड समोर आलं, पुण्यात खळबळ

Pune Crime : परपुरुषाशी संबंध असल्याचा संशय आल्याने पतीने पत्नीचा खून करून पुरावे नष्ट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हा लपवण्यासाठी आरोपी पतीने पोलिसांतच पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देत संपूर्ण तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र वारजे पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि नाट्य उघडे पाडले. न झालेल्या महिलेचे नाव अंजली समीर जाधव असून, तिचा पती समीर पंजाबराव जाधव (42 रा. शिवणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. समीरने 28 ऑक्टोबर रोजी वारजे पोलिस ठाण्यात येऊन पत्नी अंजली हरवल्याची तक्रार नोंदवली. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली.

हे वाचलं का?

अजून मिळाली का नाही माझी पत्नी? आरोपीकडून सातत्याने विचारणा अन् सगळं उघडं पडलं

अधिकची माहिती अशी की, समीर याने त्याची पत्नी अंजली ही श्रीराम मिसळ हाऊस, गोगलवाडी फाटा (शिंदेवाडी) या भागातून अचानक गायब झाली अशी तक्रार नोंदवली होती. प्रकरण राजगड पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यासाठी पोलीस प्रक्रिया सुरू झाली. पण समीरचे वर्तन संशयास्पद वाटू लागले. तक्रारदार समीर स्वतःच वारंवार पोलीस ठाण्यात हजेरी लावत होता. तो सतत — “अजून मिळाली का माझी पत्नी?” अशी विचारणा करत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन CCTV फुटेज तपासले; पण अंजली त्या भागात कुठेही दिसत नव्हती. समीरच्या बोलण्यामध्ये विसंगती लक्षात आल्याने त्याची पुन्हा कसून चौकशी करण्यात आली. अखेर दबाव वाढताच समीरने संपूर्ण कट कारस्थानाची कबुली दिली.

हेही वाचा : नंदुरबारमध्ये मोठी दुर्घटना, विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, दृश्य पाहून अंगावर काटा

कबुलीजबाबात समीरने सांगितले की, अंजलीचे सतेज पाटील नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. तिच्या मोबाईलवरील चॅट्स पाहून तो वेळोवेळी संतापत असे. घरगुती वाद वाढत चालल्याने एक महिन्यांपूर्वीच पत्नीचा खून करण्याचा निर्णय घेतल्याचे समीरने म्हटले. खून करण्यापूर्वी त्याने एक गोडाऊन 18 हजार रुपये मासिक भाड्याने घेतले. तिथे लोखंडी पेटी, पेट्रोल आणि लाकूड साठवून ठेवले होते. 26 ऑक्टोबरला समीरने पत्नीला “ड्राइव्हला” नेण्याच्या बहाण्याने घराबाहेर काढले. हुंडाई आय 10 कारने दोघे खेडशिवापूरजवळील मरीआई घाट येथे गेले. तिथून परतताना ब्राऊनस्टोन हॉटेलमध्ये थांबले, भेळ घेतली आणि थेट भाड्याच्या गोडाऊनमध्ये गेले. तिथे दोघे बसले असताना समीरने अचानक पत्नीचा गळा दोन्ही हातांनी आवळला. अंदाजे दहा मिनिटांत अंजलीचा मृत्यू झाला. मृतदेह त्याने आधीपासून ठेवलेल्या लोखंडी पेटीत ठेवून त्यावर पेट्रोल ओतले आणि जाळून टाकले. जाळलेली राख नदीपात्रात टाकली. लोखंडी पेटी स्क्रॅपमध्ये विकून टाकली. वारजे पोलिस ठाण्यात समीरवर भारतीय दंड विधानाच्या कलम 302 (खून), 201 (पुरावे नष्ट करणे) आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास राजगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'तुमच्या वडिलांनी काढलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी..' शेतकऱ्यांविरोधात गरळ ओकणाऱ्या विखेंना राजू शेट्टींनी सुनावलं

 

 

 

    follow whatsapp