कोयत्यांचा हैदोस थांबेना! टोळक्यानं घरी जाणाऱ्या कामगाराला अडवून कोयत्यानं सपासप वार केले आणि नंतर...

नरेश तिडंगे हे धानोरी रोड परिसरात काम करतात. बुधवारी रात्री तीन तरुणांनी त्यांची वाट अडवून कोयत्याने हल्ला केला. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन हस्तक्षेप केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं

Mumbai Tak

मुंबई तक

20 Jun 2025 (अपडेटेड: 20 Jun 2025, 04:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात कोयता गँगचा हौदोस सुरू

point

कामगाराला अडवून केले कोयत्यानं वार

point

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत मुसक्या आवळल्या

point

घटना नेमकी काय? हल्ला का केला?

पुणे : शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडवली आहे. विश्रांतवाडी परिसरातील धानोरी रोडवर बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तीन तरुणांनी नरेश रामचंद्र तिडंगे (वय 40) यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर एकजण फरार आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> एकाच स्कार्फने दोघांनी जीवन संपवलं! ट्रकचालक रोहित आणि डी फार्म'च्या विद्यार्थीनीमध्ये काय घडलं?

कोयत्याने हल्ला करून पळून गेले आरोपी...

नरेश तिडंगे हे धानोरी रोड परिसरात काम करतात. बुधवारी रात्री तीन तरुणांनी त्यांची वाट अडवून कोयत्याने हल्ला केला. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन हस्तक्षेप केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं. या हल्ल्यात जखमी झालेल्या नरेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी मुसक्या आवळल्या...

घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही विश्रांतवाडी परिसरातील रहिवासी असून, तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील कारणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हे ही वाचा >> भरदिवसा नग्न झाले आणि स्मशानभूमीत केला अघोरी प्रकार, कोल्हापुरातील विचित्र घटना काय? CCTV समोर

दरम्यान, या घटनेमुळे विश्रांतवाडी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत फरार आरोपीला लवकरच अटक करण्याचं आश्वासन दिलं आहे.

 

    follow whatsapp