NCRTC Recruitment: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (NCRTC) कडून मोठ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. NCRTC ने अॅक्झिक्यूटिव्ह पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ncrtc.in या 'एनसीआरटीसी'च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
NCRTC च्या या भरतीच्या माध्यमातून एकूण ८ पदे भरली जाणार आहेत. जर या पदांशी संबंधित पात्रता असलेले उमेदवार 13 जुलै 2025 पर्यंत कधीही अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणं आवश्यक आहे.
NCRTC च्या भरतीसाठी पात्रता
NCRTC च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे.
- BHM (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट)
- B.Tech / B.E (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी / इंजीनियरिंग)
- LLB (बॅचलर ऑफ लॉ)
- BHA (बॅचलर ऑफ हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन)
- B.Plan (बॅचलर ऑफ प्लानिंग)
वयोमर्यादा
NCRTC च्या या भरतीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचं कमाल वय 35 वर्षे असणं अनिवार्य आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: मार्केटमध्ये नवा स्कॅम... गूगल पेचा अधिकारी सांगून दुकानात गेला, मशिन अपडेट करायचं म्हणत डाव टाकला, घटना काय?
वेतन
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रुपये ते 1,20,000 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल.
हे ही वाचा: लाखाचे कोटी करुन देतो म्हणत फसवणूक, पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकल्यावर सापडली, कवटी, दोरे...
कसा कराल अर्ज?
1. ncrtc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. 'Careers' सेक्शनमध्ये जाऊन 'NCRTC Executive Recruitment 2025' या लिंकवर क्लिक करा.
3. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरा.
4. माहिती भरल्यानंतर आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
5. अर्ज आणि डॉक्यूमेंट्स अपलोड केल्यानंतर सबमिट करा आणि भविष्यासाठी प्रिंटआउट काढून सुरक्षितरित्या ठेवा.
ADVERTISEMENT
