भावाचं नातं विसरला, बहिणीलाच वासनेचा शिकार केलं, चीड आणणारा प्रकार

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील एका गावात चुलत भावाने त्याच्या सात वर्षांच्या निष्पाप बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे.

7 वर्षाची लहान बहिणच ठरली चुलत भावाच्या वासनेची बळी

7 वर्षाची लहान बहिणच ठरली चुलत भावाच्या वासनेची बळी

मुंबई तक

• 04:23 PM • 19 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मामेभावाने 7 वर्षीय लहान बहिणीवर केला बलात्कार

point

बिहारमधील संतापजनक घटना

Bihar News: बिहारमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एक 7 वर्षाची लहान मुलगी आपल्याच भावाच्या वासनेची बळी ठरली. सीतामढी जिल्ह्यातील महिन्दबरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावात एका त्याच्या सात वर्षांच्या निष्पाप बहिणीवर बलात्कार केला. हे घाणेरडं कृत्य केल्यानंतर झोपडीत तिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत सोडून तो पळून गेला. 

हे वाचलं का?

पीडितेच्या आईला दिली धमकी 

झोपडीत त्या लहान मुलीला अशा अवस्थेत रडताना पाहून तिथल्या काही मुलांनी पीडितेच्या आईला याबद्दलची माहिती दिली. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडितेच्या आईलाच धमकावल्याची देखील माहिती मिळाली आहे. त्यानंतर पीडित मुलीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे तिची प्रकृती आणखी गंभीर झाल्यानंतर तिला बुधवारी एसकेएमसीएच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

हे ही वाचा: M. Tech ची डिग्री, IT कंपन्यांमध्ये जॉब अन् जुगाराचा नाद... पोलिसांनी चोर पकडला, कहाणी ऐकून सगळे हादरले

चुलत भावानेच केला बलात्कार 

एसकेएमसीएच रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, या प्रकरणासंबंधी मुलीच्या आईने मेडिकल ओपीमध्ये तिचा जबाब नोंदवला आहे. पीडित मुलगी तिच्या घराजवळ घराजवळ खेळत होती आणि त्यावेळी तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या मुलीच्या चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. 

हे ही वाचा: मेट्रोमोनी साईटवर सेटिंग झाली..तरुणाने लग्नाआधीच तरुणीला गोव्याला नेलं..संबंधानंतर काय घडलं?

तिच्यासोबत असं कृत्य केल्यानंतर तिला तिथेच जखमी अवस्थेत सोडून तो तरुण पळून गेला. या घटनेनंतर मुलीची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर तिला एक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिच्या प्रकृतीमध्ये काही सुधार न जाणवल्यास तिला बुधवारी एसकेएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेडिकल ओपी प्रभारी गौतम कुमार साह यांनी सांगितले की "त्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात एका महिला अधिकाऱ्याने जबाब नोंदवला आहे. जबाबाची प्रत संबंधित पोलिस ठाण्यात पाठवली जाईल."


 

    follow whatsapp