गोष्ट पुण्याची : पुणे शहरात पाणी पुरवठ्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. पुणे शहरात 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. विविध जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्ती, फ्लो मीटर बसवणे, व्हॉल्व्ह बसवणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. तर 21 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कोल्हापुरात डॉक्टर लेकीनं 78 वर्षीय वडिलांच्या बोटाचा चावा घेत तुकडा पाडला, अंगावर गाडी घालत शिवीगाळ अन् धमकी...
3 हजार मिलीमीटरपर्यंत व्यासाच्या जलवाहनीचे काम
खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्रापर्यंत 3 हजार मिलीमीटरपर्यंत व्यासाची जलवाहनी टाकण्यात आली आहे. खडकवासला धरणातून 1400 मिलीमीटर व्यासाची दोन जलवाहिनी 3 हजार मिलीमीटर व्यास असलेल्या दलवाहिनीला जोडण्यात आले आहेत.
खडकवासला ते पर्वती या 3 हजार मिलीमीटर 3 हजार मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील फ्लो मीटर बसवणे आणि 14 हजार मीटर वाहिनीवरील बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवणे याकरीता 1400 मिलीमीटर व्यासाचे व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद होत आहेत, याच्या तपासणीसाठी व वडगाव जलशुद्धीकरण फेज 2 ची क्षमता वाढवली जात आहे. याच एकूण दुरूस्तीच्या पाईपलाईनच्या कामांसाठी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग गुरुवारी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद असेल.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षेसाठी गेला तरुण, 25 वर्षीय तरुणीशी प्रेम अन् कॅफेत अत्याचार, गर्भपात करत... मोठं कांड
'या' ठिकाणी पाणी पुरवठा बंद
तसेच नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, तसेच जुने असलेले जलशुद्धीकरण केंद्र आणि त्या अंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉइंट, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, वारजे जलकेंद्राललगतचा टाकी परिसर, शिवणे इंडस्ट्रीज परिसर, तसेच चतुश्रुंगी टाकी परिसर, होळकर जलकेंद्र, गणपती माथा, वारजे फ्रेज क्र. 1 व 2, जुने वारजे जलकेंद्र व नव्याने समाविष्ट गावे बूस्टर पंपिंग अंतर्गत येणाऱ्या परिसर el पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











