पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, तिरुपतीसाठी नवीन फ्लाईट सेवा, जाणून घ्या तिकीट दर

Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळावरून आता तरुपतीला जाण्यासाठी नवीन फ्लाइट सेवा सुरु होणार आहे. यामुळे प्रवासाचा अधिक वेळा वाचणार असून प्रवास अधिक सुकर होणार असल्याची माहिती आहे. विमानतळावर एक दोन नाही,तर 15 अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्स मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.

Pune news

Pune news

मुंबई तक

15 Apr 2026 (अपडेटेड: 15 Apr 2026, 09:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

220 वरून 235 वर स्टॉलची संख्या वाढवली

point

पुणे-सोलापूर-तिरुपती नवीन रुट कधी सुरू? 

पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळावरून आता तरुपतीला जाण्यासाठी नवीन फ्लाइट सेवा सुरु होणार आहे. यामुळे प्रवासाचा अधिक वेळा वाचणार असून प्रवास अधिक सुकर होणार असल्याची माहिती आहे. विमानतळावर एक दोन नाही,तर 15 अतिरिक्त फ्लाइट स्लॉट्स मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे आता थेट पुणे ते तिरुपतीचा हा प्रवास सुखद आणि जलद होणार आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : डोळ्यात अंगार, नामदेव ढसाळांचा झंझावात मोठ्या पडद्यावर, 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

220 वरून 235 वर स्टॉलची संख्या वाढवली

अशातच आता विमानतळाच्या स्टॉलच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. 220 वरून 235 वर स्टॉलची संख्या वाढवण्यात आली आहे. या निर्णयाने पुणे शहर हे तिरुपती, मंगळुरु आणि बागडोगरा शहराशी जोडले जाणार आहे. मोठं अंतर कापण्यासाठी मोठा फायदा होईल. महत्त्वाची बाब अशी की, पुणे ते तिरुपती असा सोलापूरमार्गाहून प्रवास होणार आहे. 

पुणे-सोलापूर-तिरुपती नवीन रुट कधी सुरू? 

पुणे-सोलापूर-तिरुपती हा नवीन रुट असेल, तर ही सेवा स्टार एअर सुरु करणार आहे. हा मार्ग सुरु होण्याची तारीख देखील समोर आली आहे. 1 मे 2026 पासून हा मार्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे ते तिरुपती प्रवास करताना प्रवाशांना हैदराबाद किंवा बंगळुरुमार्गे जाणाऱ्या विमानाने प्रवास करता येईल. यासाठी 4 ते 6 तासांच्या प्रवासाचा कालावधी लागू शकतो. दरम्यान, यासाठी 1 तास 45 मिनिटे प्रवासाचे अंतर कापले जाईल. 

हे ही वाचा : दारू पाजून 5 जणांनी लैंगिक शोषण केल्याचा पीडितेचा आरोप, 22 वर्षीय बायकोला दुसऱ्यांच्या केलं हवाली

संबंधित फ्लाईट्सच्या तिकीटांसाठी 3 हजार 500 रुपये ते 7 हजार 500 रुपये मोजावे लागतील. ही फ्लाईट सेवा उडान (UDAN) योजेनेअंतर्गत सुरु करण्यात आली. पुणेकरांसाठीचा हा प्रवास सोपा आणि कमी वेळ खर्च करणारा आहे.