इंदापुरात ट्रॅक्टर-ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ट्रॅक्टर चालकाचा आगीत होरपळून दुर्दैवी अंत

Indapur Accident : पुणे जिल्ह्यातील इंदापूरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आहे.

Indapur Accident

Indapur Accident

मुंबई तक

07 Dec 2025 (अपडेटेड: 07 Dec 2025, 01:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे जिल्ह्यातील इंदापुरात मन हेलावून टाकणारी घटना

point

ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात

Indapur Accident : पुणे जिल्ह्यातील इंदापूरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आहे. ही घटना पिंपळ गावाच्या सीमेवरील भिगवण-बारामती राज्य महामार्गावर रात्री 10:30 वाजता घडली आहे. अपघात झालेल्या दोन्ही वाहनांना आग लागली होती. याच भीषण अपघाताने लागलेल्या आगीत ट्रॅक्टर चालकाचा मृ्त्यू झाला आणि दोन्ही वाहनं आगीत होरपळून निघाली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, प्रेमसंबंध असणाऱ्या लोकांनी फक्त 'हे' करा

दोन्ही वाहनांच्या अपघाताने घेतला पेट 

मिळालेल्या माहितीनुसार, भिगवणकडे जाणारा ट्रॅक्टर आणि बारामतीकडे जाणारा उसाच्या ट्रकादरम्यान भीषण अपघात झाला. याचे परिणाम उमटण्यापूर्वीच दोन्ही वाहनांना आग लागली होती. या घटनेनं घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ट्रकाखाली ट्रॅक्टर चिरडला

अपघात इतका भीषण होता की, ट्रकाखाली ट्रॅक्टर चिरडला गेला, त्याचे दोन तुकडे झाले आणि ट्रॅक्टर चालक आतच अडकून बसला. ट्रक ट्रॅक्टरवर उलटला. तेव्हा ट्रॅक्टर चालकाचा या भीषण आगीत होरपळून जागीच मृत्यू पडला. तथापि, ट्रक चालक घटनास्थळी सापडलाच नाही.

हे ही वाचा : सोलापूर : बेघर महिलेने 3 वर्षांच्या बाळाला गोव्यात नेऊन विकले, आता DNA टेस्ट होणार, रक्ताचे नमुनेही घेतले

भिगवण पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात भिगवण पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. 

    follow whatsapp