पोहताना दम भरला, गटांगळ्या खाल्ल्या, चौघांचा तलावात बुडून मृत्यू

मुंबई तक

01 Jun 2025 (अपडेटेड: 01 Jun 2025, 04:15 PM)

Pune News : पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये एका तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. शनिवारी 31 मे रोजी ही घटना घडली आहे. या घटनेनं चाकणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Pune News Four die while swimming in Pazar lake At chakanPune News Four die while swimming in Pazar lake At chakan

Pune News Four die while swimming in Pazar lake At chakan

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू

point

दुर्देवी घटनेनं चाकणमध्ये हळहळ व्यक्त

Pune News : पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये एका तलावात पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. शनिवारी 31 मे रोजी ही घटना घडली आहे. या घटनेनं चाकणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलं ही शालेय विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : नातेवाईकांचा प्रचंड विरोध! नवऱ्याने पोलीस ठाण्यातच नवरीला लावलं सिंदूर, नेमकं घडलं तरी काय?

तलावात पोहताना मुलांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ही घटना घडली आहे. ही घटना कटाची वाडी येथे घडली आहे. या घटनेनं चाकण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान मृत मुलं ही एकाच भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. 

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार बाबासाहेब हंगे हा वय वर्षे 13 मार्तंडनगर, मेदनकरवाडी येथील रहिवासी होता. तर श्लोक जगदीश मानकरचे वय वर्षे 13 असून अमरावती जिल्ह्यातील मदनवाडी येथील राहणारा होता. तर शंकर देशमुख आणि नैतिक गोपाळ मोरे यांचे वय वर्षे 13 अशी मृतांची नावे आहेत.

मृत असलेली ही चारही मुलं कोवळी होती. शनिवारी सकाळी ते पोहण्यासाठी चाकण येथील पाझर तलावात गेली होती. पाण्यात उतरल्यानंतर खोल अंदाज न आल्याने त्यांचा दम भरून आला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. ते तलावात गटांगळ्या खाऊ लागले. त्यादरम्यान ते पाण्यात बुडून गेले. 

हेही वाचा : भाजप नेत्याच्या लेकाचा प्रताप; एक दोन नाही, तर तब्बल 130 पॉर्न व्हिडिओज्...

संबंधित प्रकरणात, चौघेही जण घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. कुटुंबिय पाझर तलावाजवळ गेल्यानंतर त्यांनी मुलांचे कपडे पाहिले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपत्ती निवारण पथकाला बोलावले. या मुलांना तलावातून बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनाना केला असता, संबंधित घटनेची पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद नमूद करण्यात आली आहे.