Pune News : पुणे शहरातील हडपसरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवसैनिक आणि मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या प्रशासनामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याने हा राडा झाला आहे. या प्रकरणात आता संतप्त जमावाने रुग्णालयाबाहेर ठिय्या मांडला, परिस्थिती पाहता घटनास्थळावरील परिस्थिती अधिकच गंभीर आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांच्या प्रेम जीवनात रोमांचक क्षण येतील, तर काही राशींना...
रुग्णाचा मृत्यू नातेवाईक संतप्त
रुग्णालयात उपचार सुरु असताना डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. अशातच आता वैद्यकीय उपचारातून रुग्णालय प्रशासनाचा कुठेतरी हलगर्जिपणा असल्याचा आरोप मृ रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. तेव्हा शिवसैनिक आणि नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयावर हल्ला करत तोडफोड केली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ठाकरे गटाच्या काही शिवसैनिकांची घटनास्थळी धाव
संबंधित घटनेची माहिती ठाकरे गटाच्या काही शिवसैनिकांना समजताच त्यांनी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान रुग्णालयाच्या आवारात तोडफोड देखील करण्यातच आली होती.
हे ही वाचा : एक्सप्रेस वेवरील 'तो' पॉईंट जिथे कारमध्ये कपलचे इंटिमेंट क्षण, महिलांचे अश्लील व्हिडिओही झाले रेकॉर्ड
रुग्णालयातील उपचारांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न
जमावाने रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला होता. रुग्णालयाच्या हलगर्जिपणाच्या आरोपांची सतत्या पडताळली जाणार आहे. या घटनेने खासगी रुग्णालयातील उपचारांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











