पुण्यातील फुरसुंगीत तरुण सराफ व्यवसायिकाने प्रेमसंबंधातून उचललं टोकाचे पाऊल, सुसाईड नोटमध्ये काय?

मुंबई तक

• 02:57 PM • 05 Apr 2026

Pune news : पुण्यातील फुरसुंगी परिसरात तरुण सराफ व्यवसायिकाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आहे. या प्रकरणात प्रेमसंबंधातील तणाव आणि कथित फसवणुकीची पार्श्वभूमी असल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

Pune news

Pune news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुणाने दुकानातच जीवन संपवलं

point

सुसाईड नोटमध्ये काय? 

Pune news : आदित्य भावार - पुण्यातील फुरसुंगी परिसरात तरुण सराफ व्यवसायिकाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आहे. या प्रकरणात प्रेमसंबंधातील तणाव आणि कथित फसवणुकीची पार्श्वभूमी असल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुण व्यवसायिकाचे नाव प्रतीक मेमाणे (वय 29) असे होते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अवैध प्रेमसंबंधाला नवऱ्याचा विरोध, बायकोने पतीचे गुप्तांग छाटलं, हादरवून टाकणारा घटनेचा थरार

घडलेल्या घटनेनुसार, संबंधित एका तरुणीने तरुणाला लग्नाचे आश्वासन दिले. नंतर जवळीक करण्यास सुरुवात केली. स्वत:ला गंभीर आजार असल्याचे सांगून सहानुभूती मिळवली. या काळात प्रतीकने मुलीवर पैसे खर्च केल्याचे सांगितले. मात्र, नंतर ती संपर्क टाळू लागल्याने आणि भेटण्यास टाळाटाळ केल्याने प्रतीक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले होते. 

तरुणाने दुकानातच जीवन संपवलं

6 मार्च रोजी त्यांनी दुकानात दोर आवळत आपलं जीवन संपवलं. सुरुवातीला हा आकस्मिक मृत्यू असल्याचे सांगितले. मात्र, नंतर पुढील तपासातून एक सविस्तर पत्र हाती लागल्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झालं. तरुणीमुळे झालेल्या मानसिक ताणाचा, विश्वासघाताचा आणि भावनिक त्रासाचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित प्रकरणात तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा : पुणे : घट्ट पकड, नाहीतर राजाला दुसरी बायको आणावी लागेल; निवृत्त सैनिकाच्या नातेवाईकांचा हवेत गोळीबार VIDEO

सुसाईड नोटमध्ये काय? 

दरम्यान, एक सुसाईड नोट देखील आढळून आली आहे, ज्यात लिहिलं की, तरुणीने आर्थिक फायद्यासाठी जवळीक साधून संबंध ठेवल्याचा आणि नंतर दुरावा निर्माण केल्याचा उल्लेख केला. यामुळे तरुण मानसिकदृष्ट्या खचल्याचे मृत व्यक्तीने सुसाईड नोटमध्ये नमूद केले. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून, सर्व बाजूंनी चौकशी केली जाते.