रील स्टार संतोष पंडितांना पोलिसांकडून रात्री 1 वाजता अटक, FIR मध्ये काय काय?

मुंबई तक

03 Sep 2026 (अपडेटेड: 03 Sep 2026, 10:01 AM)

Santosh Pandit arrest : रील स्टार संतोष पंडित यांच्याविरोधात पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीनुसार सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओवरून त्यांच्यावर विविध कलमांनुसार कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात कोणती कलमं लावण्यात आली आहेत? FIR मध्ये आणखी कोणत्या बाबींचा उल्लेख आहे? जाणून घेऊयात..

Santosh Pandit arrest

Santosh Pandit arrest

Google CTA

बातम्या हायलाइट

point

रील स्टार संतोष पंडितांना पोलिसांनी रात्री 1 वाजता घरातून अटक, FIR मध्ये काय काय?

point

FIR मध्ये आणखी कोणत्या बाबींचा उल्लेख आहे? जाणून घेऊयात..

Reel Star Santosh Pandit arrest  :  रील स्टार आणि रस्त्यांच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या संतोष पंडित यांना पुण्यातील कोथरूड पोलिसांनी रात्री सुमारे 1 वाजता त्यांच्या घरातून अटक केली आहे. संतोष पंडित यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आलेल्या काही पोस्ट आणि व्हिडीओंच्या संदर्भात एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. FIR नुसार, तक्रारदार महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संतोष पंडित यांच्या अकाऊंटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही पोस्ट आणि व्हिडीओंमधील अश्लील शेरेबाजीचा उल्लेख केला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : इंदापूर : जमिनीसाठी पोटच्या पोरांनी आई बापाला मारलं, विभक्त राहणाऱ्या लेकरांकडून हल्ला! VIDEO

तक्रारदार महिलेने संतोष पंडित यांच्याविरोधात कोणते आरोप केलेत? 

तक्रारीनुसार, संबंधित सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओमध्ये एका महिलेबाबत आक्षेपार्ह आणि लैंगिक स्वरूपाचा मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. या पोस्टमुळे महिलेचा विनयभंग होईल, तसेच तिच्या मनात लज्जा आणि अपमानाची भावना निर्माण होईल, अशा स्वरूपाचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या पोस्ट आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पाहिले गेल्याचाही महिलेने म्हटलंय. संतोष पंडित यांच्या यूट्यूब अकाउंटवरून संबंधित पोस्ट आणि व्हिडीओ प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : Personal Finance: ‘T-Bill’ ट्रिक आणि बँकेत पडून असलेल्या पैशांवर जबरदस्त परतावा

तक्रारीत मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याबाबतही सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओ प्रसारित केल्याचा उल्लेख आहे. त्यांच्याबाबत आक्षेपार्ह तसेच बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच या पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून संबंधित महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2 सप्टेंबर 2026 रोजीही अशाच प्रकारची पोस्ट आणि व्हिडीओ प्रसारित करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

संतोष पंडित यांच्याविरोधात कोणती कलमे लावलण्यात आली? 

या प्रकरणात संतोष पंडित यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 75(1)(iv), 75(3), 356(2) आणि 352, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 मधील कलम 67 लावण्यात आले आहेत. FIR मध्ये गुन्ह्याचा कालावधी 10 जुलै 2026 ते 2 सप्टेंबर 2026 असा नमूद आहे. या प्रकरणाचा तपास कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी माने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

दरम्यान, पोलिसांनी अटक केली, त्यावेळी संतोष पंडितांनी एक व्हिडीओ शूट केलाय. ‘पोलीस रात्री 1 वाजता घरात घुसले, दरवाजे -काचा वाजवल्या,..सर्वसामान्य माणसाची हीच लायकी आहे', असं संतोष पंडित म्हणाले आहेत. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

हेही वाचा : मुकेश अंबानींचा काय आहे 10 रुपयांचा मास्टरप्लॅन? नवा जुगाडाची तुफान चर्चा!