Personal Finance: ‘T-Bill’ ट्रिक आणि बँकेत पडून असलेल्या पैशांवर जबरदस्त परतावा

रोहित गोळे

बँक Savings Accountमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा T-Bill हा अल्पकालीन गुंतवणुकीचा पर्याय कसा ठरू शकतो? Treasury Bills म्हणजे काय, 10 हजारांपासून गुंतवणूक कशी करायची आणि T-Billमध्ये परतावा कसा मिळतो, जाणून घ्या सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

personal finance t bill investment trick bank savings account treasury bills rbi retail direct
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

Personal Finance Tips for T Bill: पगार, बोनस किंवा इतर कारणांमुळे बँक खात्यात काही रक्कम जमा होते. त्यातील काही पैसा लगेच खर्च होणार नसला, तरी अनेकजण तो Savings Account मध्येच ठेवतात. मात्र, कमी कालावधीसाठी पैसे बाजूला ठेवायचे असतील तर Treasury Bills म्हणजेच T-Bills हा एक पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे T-Bills हे भारत सरकारच्या अल्पकालीन कर्ज उभारणीशी संबंधित सरकारी रोखे आहेत. RBI Retail Directच्या माध्यमातून सामान्य गुंतवणूकदारांनाही त्यात गुंतवणूक करता येते.

T-Bill म्हणजे नेमकं काय?

T-Bill म्हणजे Treasury Bill. हे ठरावीक कालावधीचे सरकारी रोखे असतात. 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवसांच्या T-Billsचा वापर केला जातो. यामध्ये पारंपरिक FDप्रमाणे दर महिन्याला व्याज खात्यात जमा होत नाही. T-Bill साधारणपणे त्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जातो आणि मुदतपूर्तीनंतर दर्शनी मूल्य मिळते. या खरेदी किंमत आणि मुदतपूर्तीच्या रकमेतील फरक हा गुंतवणूकदाराचा परतावा असतो.

10 हजारांपासून गुंतवणूक शक्य

RBIच्या Retail Direct योजनेनुसार, T-Billsमध्ये किमान 10,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. Retail Direct Gilt Account उघडून व्यक्ती प्राथमिक लिलावात T-Billsसाठी बोली लावू शकते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्राथमिक लिलावात Non-Competitive Biddingची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे गुंतवणूकदाराला स्वतः किंमत किंवा Yield ठरवून बोली लावण्याची गरज नसते.

बँकेतील पैशांपेक्षा फायदा काय?

Savings Accountमध्ये पैसे ठेवण्याऐवजी अल्पकालीन गरज नसलेली रक्कम T-Billमध्ये ठेवण्याचा विचार करता येतो. यामध्ये सरकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक होत असल्याने देशांतर्गत चलनातील Government Securitiesना क्रेडिट रिस्क नसल्याचे RBI स्पष्ट करते. मात्र, मुदतपूर्तीपूर्वी विक्री केल्यास बाजारातील किंमत बदलामुळे नुकसान होऊ शकते.