मित्रांसमोर खोटं लग्न, रिसॉर्टचं काम सांगून पैसे घेतले आणि... मॅट्रिमोनिअल साईटवर विधवा महिलेसोबत भयानक प्रकार

आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी श्रीवर्धन येथील आपल्या रिसॉर्टच्या बांधकामासाठी आर्थिक अडचणी असल्याचं खोटं सांगितलं. त्यानंतर त्यानं महिलेचं क्रेडिट कार्ड घेऊन त्याद्वारे 10 लाख 10 हजार रुपये खर्च केले.

Mumbai Tak

मुंबई तक

04 Jun 2025 (अपडेटेड: 04 Jun 2025, 02:34 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मॅट्रिमोनिअल साईटवरुन विधवा महिलेची फसवणूक

point

महिलेशी खोटं लग्न केलं, पण सोबत नेलंच नाही

पुणे: गेल्या काही वर्षांपासून मुलांच्या लग्नाचा प्रश्न अनेक कुटुंबांना छळतोय. आधी नातेवाईकांच्या माध्यमातून स्थळ शोधणारे लोक आणि मॅट्रीमोनिअल साईट्सवरुन स्थळ शोधतात. मात्र, याच साईट्सवरुन अनेकांची फसवणूक होत असल्याचं दिसून आलंय. असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून घटस्फोटित महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली. घटस्फोटित महिलेला लग्नाचं आमिष दाखवत 10 लाख 10 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोथरूडमध्ये उघडकीस आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> वैष्णवीनंतर आशाराणीनेही स्वत:ला संपवलं! सोलापुरातील संतापजनक घटना, मुलीचे वडील म्हणाले...

पोलिसांनी याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात सचिन जगताप (वय 45, रा. रावेत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटस्फोटित आणि एकल महिलांना लक्ष्य करून त्यांच्याशी खोटे लग्न करून फसवणूक करण्याचा उद्योग आरोपी करीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 44 वर्षीय फिर्यादी महिला कोथरूडमध्ये राहते. तिचा यापूर्वी घटस्फोट झाला असून, ती आपला व्यवसाय सांभाळत होती. नोव्हेंबर 2023 मध्ये मॅट्रिमोनिअल वेबसाइटद्वारे तिची आरोपी सचिन जगताप याच्याशी ओळख झाली. त्याने तिला लग्नाचं प्रलोभन दाखवलं आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत तिच्याशी लग्नाचा बनाव रचला. मात्र, लग्नानंतरही आरोपीने महिलेला त्याच्या घरी नेलं नाही. ती तिच्या माहेरीच राहत होती.

हे ही वाचा >> Viral Video : मावशीकडे सुट्टीला गेलेली तरुणी पॅरासेलिंग करताना 160 फूटावरुन...व्हिडिओचा थरार पाहून अंगावर येईल काटा

आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी श्रीवर्धन येथील आपल्या रिसॉर्टच्या बांधकामासाठी आर्थिक अडचणी असल्याचं खोटं सांगितलं. त्यानंतर त्यानं महिलेचं क्रेडिट कार्ड घेऊन त्याद्वारे 10 लाख 10 हजार रुपये खर्च केले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेनं कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सचिन जगताप याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांचा संशय आहे की, आरोपी हा असाच प्रकार इतर घटस्फोटित व एकल महिलांसोबत करीत असावा. याप्रकरणी पुढील तपास कोथरूड पोलिस करीत आहेत. मॅट्रिमोनिअल वेबसाइटद्वारे ओळख करून घेणाऱ्या व्यक्तींबाबत सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

    follow whatsapp