Pune Crime: पुणेकरांसमोर त्याने घेतला तरुणीचा जीव, एकही आला नाही धावून!

मुंबई तक

09 Jan 2025 (अपडेटेड: 05 Mar 2025, 04:22 PM)

ऑफिस पार्किंगमध्ये महिला सहकाऱ्याची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील येरवडा परिसरात घडली आहे.

पुणेकरांसमोर त्याने घेतला तरुणीचा जीव

पुणेकरांसमोर त्याने घेतला तरुणीचा जीव

Google CTA

पुणे: पुण्यात एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाने कंपनीच्या पार्किंगमध्ये एका महिला सहकाऱ्याची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मुलगी जमिनीवर बसलेली दिसत आहे आणि तरुण तिच्यावर चाकूने हल्ला करत होता.

हे वाचलं का?

यावेळी तिथे बरेच लोक उभे असलेले दिसतात, पण कोणीही त्या तरुणाला थांबवत नव्हतं. जेव्हा तो तरुण चाकू फेकून निघून जायला लागला तेव्हा लोक पुढे येऊन त्याला थांबवू लागले. तर काही लोकांनी त्याला मारहाणही केली. यानंतर काही लोक जमिनीवर पडलेल्या महिलेकडे लक्ष देतात पाहायला मिळाले.

हे ही वाचा>> लग्नाची Anniversary अन् पती-पत्नीने दिला जीव, आत्महत्येआधी Video केला शेअर

'मुलीने पैसे उधार घेतले आणि ते परत करण्यास नकार दिला नकार', आरोपीचा दावा

आरोपी तरुणाचे नाव कृष्णा कनोजा (वय 30 वर्ष) आहे. तो येरवडा येथील WNS ग्लोबल (एक बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग कंपनी) मध्ये अकाउंटंट आहे. त्याने सांगितले की, त्याची सहकारी शुभदा कोदारे (वय 28 वर्ष) हिने त्यांच्याकडून अनेक वेळा पैसे उधार घेतले होते. तिने त्याला सांगितले होते की, तिचे वडील आजारी आहेत आणि त्यांच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता आहे.

पुढे तो असं म्हणाला की, जेव्हा त्याने शुभदाला पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा तिने तिच्या वडिलांच्या प्रकृतीचे कारण देत पैसे परत करण्यास नकार दिला. यानंतर कनोजा शुभदाच्या गावी गेला आणि त्याला सत्य कळलं. त्याला समजलं की, शुभदाचे वडील पूर्णपणे निरोगी आहेत आणि त्यांना कोणताही त्रास नाही.

हे ही वाचा>> Thane Crime News : सख्खा भाऊच ठरला पक्का वैरी! खिशातून न विचारता 500 रुपये घेतले म्हणून भावानेच केली धाकट्याची हत्या

मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास, कनोजाने शुभदाला त्यांच्या ऑफिसच्या पार्किंग एरियामध्ये बोलावलं आणि तिला दिलेले उधार पैसे परत मागितले. यावेळी शुभदाने पैसे परत करण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि संतप्त झालेल्या कनोजाने सोबत आणलेल्या चाकूने शुभदावर जीवघेणा हल्ला केला.

गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.