Nepal Violence: बापरे... ठाण्यातील 112 पर्यटक नेपाळमध्ये अडकले, नेमकी परिस्थिती काय?

Nepal violence Maharashtra Touroist: ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील 112 जण हे सध्या नेपाळमध्ये अडकले आहेत. त्यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना मदतीचं आवाहन केलं आहे.

112 tourists from thane are stuck in nepal what is the exact situation tourists seek help from bjp mla kisan kathore

नेपाळमध्ये हिंसाचार (फोटो सौजन्य: PTI)

मिथिलेश गुप्ता

• 05:00 AM • 11 Sep 2025

follow google news

काठमांडू: नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर बंदी आणली आणि त्याविरोधात हजारो नेपाळी युवकांनी जोरदार आंदोलन केलं. काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 23 हून अधिक नेपाळी नागरिक हे मृत्यूमुखी पडले. त्यानंतर संपूर्ण नेपाळमध्ये उद्रेक झाला आणि परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. दरम्यान, याच वेळी ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यातील 112 पर्यटक हे नेपाळमध्ये सुरु असलेल्या दंगलीत अडकून पडले. ज्याची माहिती मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

मुरबाडचे 112 पर्यटक अडकले नेपाळमध्ये

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील रहिवासी असलेले 112 पर्यटक हे नेपाळमधील दंगलीमुळे नेपाळमध्येच भीतीच्या छायेखाली हॉटेलमध्ये वास्तव करीत आहे. नेपाळमध्ये अडकलेले हे पर्यटक सुखरूप भारतात परत यावेत यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांच्याशी संवाद साधला. या पर्यटकांची परतीच्या प्रवासाची सुखरूपपणे सुटका व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अशी माहितीही आमदार किसन कथोरे  यांनी दिली आहे.

हे ही वाचा>> जावयाने विधवा सासूला हॉटेलमध्ये नेलं अन् केलं घृणास्पद कृत्य! नंतर अश्लील व्हिडीओ सुद्धा...

चिंताजनक बाब म्हणजे 112 पर्यटकापैकी 47 पर्यटक हे दंगलखोरांचा उद्रेक असलेल्या काठमांडू  शहरातील एका हॉटेलमध्ये आतापर्यंत सृखरूप आहेत. तर 65 पर्यटक पोखरण या शहरात एका हॉटेलमध्ये भीतीच्या छायाखाली असून या सर्व पर्यटकांनी आमदार किसन कथोरे यांच्याशी मोबाइलवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून नेपाळमधील घटनेची माहिती दिली आहे. तसेच आमची इथून लवकरात लवकर घरवापसी करा अशी विनंती देखील त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्याकडे केली आहे.

नेेपाळमध्ये अडकलेले मुरबाडमधील नागरिक

दुसरीकडे भारत सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून भारतातील नेपाळमधील हवाई उड्डाणं बंद केली आहेत. त्यामुळे आता अडकलेल्या पर्यटकांना पुन्हा भारतात नेमकं कसं आणलं जाणार असा सवाल उपस्थित होत आहे.

नेपाळमध्ये अचानक एवढा हिंसाचार का उसळला?

नेपाळमधील ललितपूरमध्ये एका प्रांतीय मंत्र्यांच्या गाडीने 11 वर्षांच्या मुलीला धडक दिली होती. पण मंत्र्यांच्या चालकाला 24 तासांतच सोडून देण्यात आले. एवढेच नाही तर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी हा अपघात किरकोळ असल्याचे म्हटले होते. ज्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आधीच संतापलेल्या Gen-Z ही रस्त्यावर  उतरली. नंतर या ठिणगीचे रूपांतर मोठ्या आंदोलनात झाले.

हे ही वाचा>> अजित पवारांनी IPS अधिकाऱ्याला फोन केलेल्या गावात महसूल अधिकाऱ्यांना मारहाण.. Video तुफान व्हायरल

शनिवारी सकाळी 7.15 च्या सुमारास हा अपघात घडला. कोशी प्रांताचे अर्थमंत्री राम बहादूर मगर यांच्या सरकारी गाडीने 11 वर्षांच्या मुलीला धडक दिली. ललितपूरमध्ये रस्ता ओलांडताना मुलीचा अपघात झाला होता. मुलीच्या चेहऱ्याला बरीच दुखापत झाली होती. त्यानंतर तिला ग्वार्को येथील बी अँड बी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांचे म्हणणे आहे की, ती शुद्धीवर आली होती आणि बोलू शकत होती.

या अपघातानंतर संतप्त स्थानिकांनी गोदावरी रोड रोखला. त्यांनी रस्त्यावर वाहने आणि बेंच टाकून रस्ता रोखला. दरम्यान, नंतर मंत्री रुग्णालयात गेले, पण जनतेचा राग शांत झाला नाही. ड्रायव्हरची सुटका आणि पंतप्रधान ओली यांनी त्याला किरकोळ मुद्दा म्हटले त्यामुळे लोकांचा राग आणखी उफाळून आला. नेत्यांसाठी जनतेच्या जीवाची काहीच किंमत नाही असे तरुणांना वाटले. हाच राग आंदोलनाचे एक प्रमुख कारण मानले जाते.

    follow whatsapp