असा Job जो तुमचं नशीबचं टाकेल बदलून; तब्बल 84 लाख रुपये पगार, काम फक्त...

घरगुती कामासाठी तब्बल 84 लाख वार्षिक वेतन मिळणार आहे. जाणून घ्या अशा स्वरुपाची नोकरी नेमकी कुठे आहे.

JOB (फोटो सौजन्य: Grok)

JOB (फोटो सौजन्य: Grok)

मुंबई तक

01 May 2025 (अपडेटेड: 02 May 2025, 12:19 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दुबईत हाऊस मॅनेजर या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी

point

मासिक वेतन हे 7 लाख देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे

point

वार्षिक वेतन हे 84 लाख देण्यात येणार आहे

Job Opportunity: दुबई: सोशल मीडियावर अनेक नोकरीच्या जाहिराती प्रसारित होत असतात. अशाच एका नोकरीच्या जाहीरातीची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे, ज्यात तब्बल 84 लाखांचे वार्षिक वेतन मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यासाठी आता कोणत्याही पदवीची आवश्यकता नसणार आहे. या नोकरीत असं नेमकं काय आहे, ज्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात वेतन वाढ दिली जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे वाचलं का?

ही नोकरी भारतात नसून दुबईची राजधानी अबूधाबीमध्ये आहे. हाऊस मॅनेजर या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.  तब्बल मासिक वेतन हे 7 लाख देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित नोकरीची पोस्ट ही दुबईतील प्रमुख घरगुती कर्मचारी आणि नोकरीची सेवा पुरवणाऱ्या रॉयल मॅन्शन कंपनीने पोस्ट केली आहे. 

हेही वाचा : CBSE Result 2025: उद्या दहावी-बारावीचा निकाल लागणार? बोर्डाकडून मोठी अपडेट आली समोर!

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले की, Job Opportunity फुल टाईम हाऊस मॅनेजर, आम्हाला दुबईतील आबूधाबीमध्ये हाऊस मॅनेजरची जागा भरणे आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या घरांमध्ये काम करण्यासाठी या नोकरीची सुवर्ण संधी असल्याची माहिती रॉयल मेशन या कंपनीने दिली होती. सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी आपल्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला होता. 

हे ही वाचा : महाराष्ट्र दिन विशेष: जय जय महाराष्ट्र माझा... हे गाणं कोणी लिहिलेलं, काय आहे नेमका इतिहास?

पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव 

काही नेटकऱ्यांनी संबंधित पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे. ज्यात त्यांनी आपण स्वत:ची नोकरी सोडून अशा नोकरीला सर्वाधिक पसंती दिली आहे. जर अशी नोकरी मिळत असेल तर आम्ही आमची नोकरी कधीही सोडू असे अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

नेमकं काय आहे काम? 

हाऊस मॅनेजर पदासाठी घरात काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांवर लक्ष्य ठेवणे, देखरेख करावी लागेल, समन्वय साधावा लागेल, घरात होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे हाऊस मॅनेजरचे असणार असल्याची माहिती संबंधित पोस्टमध्ये देण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित एजन्सी ही घरगुती सेवांसाठी ओळखली जाते. 
 

    follow whatsapp