उन्हाळा म्हटलं की अनेकांच्या मनात पहिला विचार येतो, तो म्हणजे आइस्क्रीमचा. आइस्क्रीम खायला कोणाला आवडत नाही? खास करुन उन्हाळ्यात अनेकजण आइस्क्रीम खाणं पसंत करतात. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की आइस्क्रीम खाणे काही लोकांसाठी खूप धोकादायक ठरू शकते. अशा लोकांना चुकूनही आइस्क्रीमचं सेवन करू नये. याविषयी सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
डायबिटीजच्या रुग्णांनी राहा दूर
आइस्क्रीम बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात साखर वापरली जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही मधुमेहाचे म्हणजेच डायबिटीजचे रुग्ण असाल तर तुम्ही ते खाणं टाळावे. त्याचे सेवन केल्याने तुमची साखरेची पातळी अचानक वाढून तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
हृदयरोग्यांसाठी आइस्क्रीमचं सेवन धोकादायक
आइस्क्रीम बनवण्यासाठी बरीच हानिकारक रसायने वापरली जातात, जी हृदयासाठी हानिकारक असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही हृदयरोगी असलात तरी, तुम्ही आइस्क्रीम खाणं पूर्णपणे टाळावे.
हे ही वाचा: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात नवा ट्वीस्ट, 'त्या' आरोपींच्या वकिलाचे पोलिसांवरच धक्कादायक आरोप
दातांवर सुद्धा विपरित परिणाम
जास्त आइस्क्रीम खाल्ल्याने दातांमध्ये कॅव्हिटी निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला याचा कालांतराने खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे दररोज आइस्क्रीम खाणे टाळा. जेवताना दात घासण्याची सवय ठेवा.
लठ्ठपणाला देतं आमंत्रण
जगभरात लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्याची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी हे यामागील मुख्य कारण आहे. आइस्क्रीम खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते. त्यात भरपूर कॅलरीज आढळतात. जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज वाढतात. अतिप्रमाणात याचं सेवन केल्याने तुमचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू लागेल आणि तुम्ही लठ्ठपणाला आमंत्रण द्याल. जर तुम्ही लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आइस्क्रीम खाणे टाळा.
ADVERTISEMENT
